नागपुरात क्वारंटाईन नसलेले दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संशयित नागरिकांना क्वारंटाईन केलं जात आहे (Nagpur Corona patients). या नागरिकांना शासकीय विलगीकरण कक्षात किंवा होम क्वारंटाईनमध्ये ठेवलं जात आहे.

नागपुरात क्वारंटाईन नसलेले दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह
Follow us
| Updated on: Apr 23, 2020 | 8:01 AM

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी संशयित नागरिकांना क्वारंटाईन केलं जात आहे (Nagpur Corona patients). या नागरिकांना शासकीय विलगीकरण कक्षात किंवा होम क्वारंटाईनमध्ये ठेवलं जात आहे. मात्र, नागपुरात काल (22 एप्रिल) क्वारंटाईनमध्ये नसलेल्या दोन रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हे नागरिक आणखी किती लोकांच्या संपर्कात आले, याचा शोध प्रशासन घेत आहे. या दोन रुग्णांसह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 100 वर पोहोचली आहे (Nagpur Corona patients).

नागपुरातील टिमकी आणि कमाल चौक परिसरातील हे दोन नवे कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या दोन्ही रुग्णांना त्रास होऊ लागल्याने ते रुग्णालयात दाखल झाले होते. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती सध्या प्रशासन घेत आहे. नव्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केलं जात आहे. दरम्यान, नागपुरात आतापर्यंत 14 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

नागपूरमधील अनेक परिसर सील

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. नागपूरमध्ये ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तो परिसर पूर्णपणे सील करण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे याकडे लक्ष देत आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5649 वर

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. राज्यात काल (22 एप्रिल) नव्या 431 कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 649 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 683 वर पोहोचला आहे. तर पुणे शहर आणि ग्रामीण भागात एकूण 753 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोरोना रुग्णांची अपडेट आकडेवारी

Edit
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 3683 374 161
पुणे (शहर+ग्रामीण) 753 125 55
पिंपरी चिंचवड 52 12 2
ठाणे (शहर+ग्रामीण) 190 20 6
नवी मुंबई 101 19 3
कल्याण डोंबिवली 97 31 3
उल्हासनगर 1 1
भिवंडी 7 2
मीरा भाईंदर 81 5 2
पालघर 19 1 1
वसई विरार 115 12 3
रायगड 16 3 0
पनवेल 35 13 1
नाशिक (शहर +ग्रामीण) 11 2
मालेगाव 94 9
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 29 16 2
धुळे 9 1
जळगाव 6 1 2
नंदूरबार 7
सोलापूर 30 3
सातारा 16 3 2
कोल्हापूर 9 2
सांगली 27 26 1
सिंधुदुर्ग 1 1
रत्नागिरी 8 1 1
औरंगाबाद 38 14 5
जालना 2
हिंगोली 7 1
परभणी 1
लातूर 8 8
उस्मानाबाद 3 3
बीड 1
नांदेड 1
अकोला 21 1
अमरावती 7 1
यवतमाळ 18 7
बुलडाणा 24 8 1
वाशिम 1
नागपूर 100 12 1
गोंदिया 1 1
चंद्रपूर 2 1
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 17 2
एकूण 5649 789 269

संबंधित बातम्या :

पंतप्रधान तिसऱ्यांदा सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार, 3 मेनंतरच्या रणनीतीविषयी चर्चेची शक्यता

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.