कोरोना, म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी नागपूर प्रशासनाची मोहीम, 2 दिवसात अधिकाऱ्यांच्या शंभर गावांना भेटी

गेल्या दोन दिवसात अधिकाऱ्यांनी शंभराहून अधिक गावे पिंजून काढली. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या मोहिमेचा नियमित आढावा घेत आहेत.

कोरोना, म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी नागपूर प्रशासनाची मोहीम,  2 दिवसात अधिकाऱ्यांच्या शंभर गावांना भेटी
म्युकरमायकोसिस, कोरोना नियंत्रणासाठी नागपूर प्रशासनाची मोहीम
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 10:40 PM

नागपूर : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी नागपूर जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केलं आहे. गेल्या दोन दिवसात अधिकाऱ्यांनी शंभराहून अधिक गावे पिंजून काढली. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या मोहिमेचा नियमित आढावा घेत आहेत. ग्रामीण भागाला कोरोनाच्या सावटातून दूर काढण्यासाठी या मोहिमेतून गावागावाचा कृती आराखडा तयार केला जात आहे. तशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलीय. (Nagpur administration’s campaign for prevention of mucormycosis and Corona)

नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ग्रामीण भागातील दौऱ्याचा धडाका लावलाय. सलग दुसऱ्या आठवड्यात त्यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक उपकेंद्र यांना भेटी देणं सुरु ठेवलंय. सोबतच मोठ्या प्रमाणात गावागावांमध्ये प्रचार प्रसिद्धी मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात तेरा तालुक्यांमध्ये 52 अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.

कृती आराखड्याबाबत गावपातळीवर मार्गदर्शन

अधिकाऱ्यांमार्फत प्रशासनातील गाव पातळीवरील कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, संबंधित गावाचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व अन्य पदाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात येत आहे. कोरोना, म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी कोणती उपाययोजना करायची, गावामध्ये कसा कृती आराखडा तयार करायचा याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे. सर्व अधिकाऱ्यांना यासंदर्भात कार्यशाळा घेऊन प्रशिक्षित करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या व्हिडिओद्वारे गावागावात मार्गदर्शन केलं जात आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये 59 गावे पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोना पासून अलिप्त राहिली आहे. या गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवणे, नियमित तपासण्या, लसीकरणाला शंभर टक्के प्रतिसाद, कोरोना प्रोटोकॉल काटेकोर पाळणे व बाहेरील येणाऱ्या व्यक्तीची तपासणी करून त्यांना प्रवेश देणे, उपाय योजना करण्यात आल्या होत्या. त्या उपाययोजना आता प्रत्येक गावात करण्याच्या सूचनादेखील या बैठकांमधून दिल्या जात आहे.

Nagpur Campaign

म्युकरमायकोसिस आणि कोरोना नियंत्रणासाठी नागपूर प्रशासनाची विशेष मोहीम

गावांमध्ये 100 टक्के लसीकरणासाठी प्रयत्न

प्रत्येक गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी गावपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच या सार्वजनिक उपक्रमात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबापासून सुरुवात करून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमधील लसीकरणाचे भय व गैरसमज काढण्याचे काम देखील केले जात आहे. जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी प्रत्येक टीमकडून येणाऱ्या प्रतिसादावरून प्रत्येक गावच्या कोरोनाविरुद्ध लढायच्या आराखड्याची तयारी करत आहे.

संबंधित बातम्या :

आता कोरोना चाचणीसाठी शहरात जायची गरज नाही, वर्ध्यातील ग्रामीण भागात आरटीपीसीआर टेस्टची सोय

‘तीन दिवसात कारणे दाखवा, अन्यथा…’, जैविक कचरा उघड्यावर फेकून कोरोनाला निमंत्रण देणाऱ्या रुग्णालयाला नोटीस

Nagpur administration’s campaign for prevention of mucormycosis and Corona

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.