नागपूरचे महापौर संदीप जोशींचा आधी विधानपरिषदेला पराभव, आता कोरोनाने गाठले

नागपूरचे महापौर संदीप जोशींनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली असून संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. (Sandip Joshi Corona Positive)

नागपूरचे महापौर संदीप जोशींचा आधी विधानपरिषदेला पराभव, आता कोरोनाने गाठले
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 1:27 PM

नागपूर: विधापपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर महापौर संदीप जोशी यांना कोरोनाने गाठले आहे. संदीप जोशी यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. जोशींनी गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर संदीप जोशी महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. (Nagpur Mayor Sandip Joshi tasted Corona Positive)

संदीप जोशी यांनी ट्विटरवरुन कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरु केले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांत संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असंही आवाहन संदीप जोशींनी केले आहे. कोरोनातून मुक्त होऊन लवकरच लोकसेवेत पुन्हा रुजू होणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. (Nagpur Mayor Sandip Joshi tasted Corona Positive)

महापौर संदीप जोशींचे ट्विट

भाजपच्या बालेकिल्ल्यात पराभव

गेल्या 55 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात (Nagpur Graduate Constituency Election) काँग्रेसने झेंडा फडकवला. भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांचा पराभव करत काँग्रेसचे अभिजीत वंजारी (Abhijit Vanjari) मोठ्या फरकाने विजयी झाले.

काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांना 61 हजार 701 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 42 हजार 991 मतांवर समाधान मानावे लागले. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा 18 हजार 710 च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला.

“नागपूरच्या पराभवाची दिल्लीपर्यंत चर्चा”

“नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असल्याने नागपूरच्या या पराभवाची दिल्लीपर्यंत चर्चा झाली आहे” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विजयी उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजयानंतर दिली होती.

भाजप बेसावध, मुनगंटीवारांची कबुली

‘महाविकास आघाडीला मतदारांनी स्वीकारलं, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण ही सार्वत्रिक निवडणूक नाही. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या जागा होत्या, हे खरं आहे. त्या गमावणं हे राजकीय दृष्टीने चिंतनीय आहे. त्याचं चिंतन केलं जाईल. आम्ही बेसावध राहिलो, त्यामुळे निकालात बदल दिसला, आम्ही कुठे कमी पडलो त्याचं विश्लेषण करु, पण भाजपची पिछेहाट अजिबात नाही. ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखं आपण पदवीधरमध्ये जिंकून येतो, हा आभास होता’ असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केलं.

संबंधित बातम्या:

नागपूरचे महापौर संदीप जोशी राजीनामा देण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळ

तेलही गेलं, तूपही गेलं; आधी महापालिका निवडणुकीत माघार, आता संदीप जोशींनी पदवीधर मतदारसंघही गमावला

(Nagpur Mayor Sandip Joshi tasted Corona Positive)

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.