कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये व्यवस्थित राहत नाहीत? आता भरारी पथकाची नजर ठेवणार

ज्यांना कोरोनाची गंभीर लक्षणं नाहीत पण ते पॉझिटिव्ह आहेत, अशा रुग्णांना सध्या होम आयसोलेशनमध्येच ठेवण्यात आलं आहे. पण हे रुग्ण तिथेही नियमांचा भंग करत असल्याचं दिसून येत आहे.

कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये व्यवस्थित राहत नाहीत? आता भरारी पथकाची नजर ठेवणार
Nagpur corona
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 9:04 PM

नागपूर : राज्यात आता जवळपास सर्वच विभागात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतोय. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावतीसह अनेक जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून वारंवार नियम पाळण्याचं आवाहन केलं जात असलं तरी ते पायदळी तुडवण्याचंच काम सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यांना कोरोनाची गंभीर लक्षणं नाहीत पण ते पॉझिटिव्ह आहेत, अशा रुग्णांना सध्या होम आयसोलेशनमध्येच ठेवण्यात आलं आहे. पण हे रुग्ण तिथेही नियमांचा भंग करत असल्याचं दिसून येत आहे.(Bharari Squad to monitor corona patients kept in Home Isolation)

भरारी पथक कशासाठी?

होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेले रुग्ण तिथे व्यवस्थित राहत आहेत का? ते रुग्ण कोरोना नियमांचं पालन करत आहेत का? याची पाहणी करण्यासाठी आता भरारी पथकांची स्थापना केली जाणार आहे. झोन निहाय हे भरारी पथक नेमले जाणार आहे. प्रत्येक झोन मध्ये 2 भरारी पथकं असणार आहेत. हे पथक रुग्णांच्या घरी अचानकपणे भेट देऊन रुग्ण घरातच आहेत की नाही? याची पडताळणी करणार आहेत.

कसं असेल भरारी पथक?

होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांवर पाळत ठेवण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या प्रत्येक भरारी पथकात 4 सदस्य असतील. त्यात 2 शोध उपद्रव पथकातील जवान असणार आहेत. रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्यानंतही रुग्ण नियमांचं उल्लंघन करत असेल तर त्यावर चौकशी अंती कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

नियम मोडल्यास शिक्षा

नियम मोडणाऱ्या रुग्णांवर साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अशा रुग्णांना 10 दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल. तसंच त्यांच्याकडून 5 हजार रुपये दंडाची आकारणीही केली जाणार आहे. तसे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे नागपुरात सध्या घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, हे निश्चित आहे.

नागपुरातील कोरोनाची स्थिती

नागपुरात आज पुन्हा एकदा 1 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांत नागपुरात 1 हजार 276 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दिवसरात 1 हजार 39 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. नागपुरातील आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या पाहिली तर ती 1 लाख 59 हजार 5 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 1 लाख 43 हजार 528 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 401 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

लोका सांगे ब्रह्मज्ञान…. नागरिकांना दटावणाऱ्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची विनामास्क भ्रमंती

नागपुरात कोरोनाचं संकट गडद, दररोज हजारच्यावर नवे रुग्ण, प्रशासन चिंतेत

Bharari Squad to monitor corona patients kept in Home Isolation

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.