Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात बांगलादेश कनेक्शन? पोलिसांनी दिले महत्वाचे अपडेट्स

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या वादानंतर मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत दगडफेक, पेट्रोल बॉम्ब आणि जाळपोळ झाली. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. पोलिसांच्या पत्रकार परिषदेत, आरोपी नागपूरचे नसल्याचे समोर आले. तपास सुरू आहे आणि सोशल मीडियावरील उत्तेजक पोस्ट ब्लॉक केल्या जात आहेत. अनेक भागांमध्ये संचारबंदी आहे.

Nagpur Violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात बांगलादेश कनेक्शन? पोलिसांनी दिले महत्वाचे अपडेट्स
नागपूर हिंसाचारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2025 | 12:59 PM

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून राज्यात वातावरण तापलेलं असतानाच सोमवारी नागपूरमध्ये मोठा हिंसाचार झाला. नागपूरच्या महाल भागात मोठा हिंसाचार झाला, दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यातून तुफान दगडफेक झाली. पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले, पोलिसांवरही हल्ला करण्यात आला.जाळपोळ झाली. अनियंत्रित जमावाला आवरताना पोलीस, अग्निशमन दलाचे जवानही या हिंसाचारात जखमी झाले. या हिसांचारामुळे नागपूरमध्ये अजूनही तणावाचं वातावरण असून अनेक भागांत अद्यापही संचारबंदी आहे.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांची नुकतीच पत्रकार परिषद झाली, त्यावेळी सायबर विभागाचे डीसीपी लोहित मतांनी यांनी महत्वाची माहिती दिली. या राड्यातील आरोपी नागपूरचे नसल्याचा महत्वाचा खुलासा त्यांनी केला. सर्व तपास सुरू असून घोषणा देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच यापुढे कोणतीही अनुचित घटना घडू नये, तेढ वाढू नये यासाठी सोशल मीडियावरील पोस्ट ब्लॉक करण्याचं काम सुरू आहे, असंही मतांनी यांनी नमूद केलं. नागपूर हिंसाचाराला कारणीभूत ठरलेले व्हिडिओ इतर देशातील आहेत. सायबर पोलिसांना तपासात हिंसाचार भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडले होते.

50 टक्के पेजेस ब्लॉक

या हिसांचार प्रकरणात आत्तापर्यंत 46 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. या राडा प्रकरणात फहीम खान हे नाव समोर आलंय. फहीम खान या सगळ्या हिंसाचारामागचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे. त्याच्या सोशल मीडियावर बरेच वादग्रस्त कंटेट सापडला आहे. बांगलादेश आणि इतर काही ठिकाणांहून पेजेस चालवल्याचा आरोप आहे, त्याबद्दल पोलिसांना प्रश्न विचारण्यात आला. सर्व फेसबुक पेजेस ब्लॉक केले. 17 ते 19 तारखेपर्यंतचे सर्व पेजेस ब्लॉक करण्यासाठी आम्ही संबंधित एजन्सीला पाठवले आहेत. त्यामध्ये 50 टक्के पोस्ट ब्लॉकही झाल्या आहेत. फहीम खान याच्यावर आधीचेही गुन्हे आहेत. दगडफेक करतेवेळी घोषणा देणाऱ्यांवरही कारवाई केली आहे

फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा

गुन्हा नंबर 30/25मध्ये देशद्रोहाचा चार्ज लावण्यात आला आहे. त्या अंतर्गंत,पोलिसांच्या विरोधात जी दगडफेक झाली त्याचं ग्लोरिफिकेशन केलं गेलं, त्यासोबत काही कमेंट आणि कॅप्शन टाकलं आहे. अल्ला हू अकबर आणि सर तन से जुदा असे कॅप्शन होतं. हिंसा भडकवण्यासाठी आणि तिचं उदात्तीकरण करण्यासाठी हे केलं गेलं. असं करणाऱ्या लोकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30/25 कलमांतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीम खान सहीत सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. अजून काही लोक त्यात ॲड होतील, असेही पोलिसांनी सांगितलं.

बांगलादेशचं कनेक्शन होतं की नाही याचा तपास करत आहोत. केवळ प्रोफाईलवर बांगलादेश लिहिलं म्हणून त्यावर कमेंट करू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केलं. १५२ सेक्शन आम्ही लावलं आहे. पण आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे की नाही यावर बोलणार नाही. काल रात्री एफआयआर दाखल केली आहे. एफआयआरचा तपास होईल. त्यानंतर सर्व माहिती कळेल.

पत्रकार परिषदेतील इतर महत्वाचे मुद्दे

चार एफआयआर दाखल केले आहे. 50 हून अधिक आरोपी आहेत. अधिक आरोपी ॲड होतील.फंडिंग झालं की नाही हे दिसलं नाही. एनआयमार्फत चौकशी करायची की नाही त्याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. एसआयटीचा निर्णय राज्य सरकार घेईल.

ज्यांनी औरंगजेबचा जुना व्हिडीओ व्हायरल केला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पण देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही. ज्यांनी हिंसेचा व्हिडीओ व्हायरल करून आणखी हिंसा भडकवण्याची अपील केली त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. फहीम खान मास्टरमाइंड आहे की नाही हे सांगता येत नाही. पण मास्टरमाइंडपैकी एक म्हणू शकतो, अजून तपास सुरू आहे. फहीम खानच्या फेसबुकवरून आक्षेपार्ह पोस्ट मिळाल्या आहेत. हिंसा भडकणवारे पोस्ट मिळाले आहेत. या पोस्टमुळे घटना घडली आहे. ही हिंसा वाढली आहे

छावा मुव्हीशी संबंधित काहीच एफआयआरमध्ये नाही. पहिल्या एफआयआरमध्ये व्हायोलन्स कसा झाला याची माहिती आहे. दुसऱ्या एफआयरमध्ये व्हायलन्स झाल्यावर हिंसेचे व्हिडीओ व्हायरल केले गेले याची माहिती आहे. तिसऱ्या एफआयआरमध्ये कमेंट बाबतचा आहे. चौथ्यामध्ये हिंसेचं उदात्तीकरण केलं आणि हिंसा भडकवण्यासा उद्युक्त करण्यात आलं.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.