नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्लास्टिक (Plastic) बंदी आहे. मात्र, अनेक ठिकाणी अजूनही सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जातोयं. राज्यात जरी प्लास्टिकवर बंदी (Ban) असली तरी इतर राज्यातून प्लास्टिक आयात केले जात असल्याने अनेक ठिकाणी प्लास्टिक विक्री सुरूयं. सध्या राज्यात सणासुदीला सुरूवात झाल्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर केला जातोयं. मात्र, आता प्लास्टिक विक्री करणाऱ्यावर प्रशासनाने धडक कारवाई करण्यास सुरूवात केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. नागपूर शहरात प्रशासनाने (Administration) मोठी कारवाई करत 7 लाख 5 हजार रुपयांचा दंड वसूल केलायं.
नागपूर शहरात प्लास्टिक विक्री विरोधात प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जातंय. गुजरातमधून आणलेले तीन हजार टन प्लास्टिक जप्त प्रशासनाकडून जप्त करण्यात आल्याने प्लास्टिक विक्रेत्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे चित्र शहरात बघायला मिळते आहे. प्लास्टिक विक्रीवर बंद असताना देखील शहरात काहीन ठिकाणी प्लास्टिक विक्री होत असल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाकडून ही कारवाई केली जातंय.
शहरातील तीन हजार टन प्लास्टिकवर नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने ही कारवाई केलीयं. यामध्ये प्रशासनाकडून तब्बल 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली असून 7 लाख 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलायं. धंतोली, गांधीबाग, लकडगंज आणि सतरंजीपुरा झोनमध्ये ही कारवाई केली आहे. प्लास्टिक बंदी असताना शहरात प्लास्टिक चा सर्रास वापर केला जातोयं.