Nagpur ST | आधी एसटी बससमोर नतमस्तक, नंतर लालपरीचं स्टेअरिंग हाती; नागपूर विभागात 327 कर्मचारी रुजू

संपावर गेलेल्या एसटी कर्मचार्‍यांना येत्या 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. रोज कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. मंगळवारी 327 कर्मचारी नागपूर विभागातून रुजू झाले. यात 147 चालकांचा समावेश आहे.

Nagpur ST | आधी एसटी बससमोर नतमस्तक, नंतर लालपरीचं स्टेअरिंग हाती; नागपूर विभागात 327 कर्मचारी रुजू
नागपूर स्थानकावर बस सुरू करताना चालक. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 10:08 AM

नागपूर : गेली साडेपाच महिने आम्ही या मायमावलीला मिस करत होतो. आमचं पोट भरवणाऱ्या या बसच्या सेवेत आम्ही रुजू झालो. आधी पाया पडलो मग बसमध्ये प्रवेश (bus entry) केला. साडेपाच महिन्यानंतर आज हातात स्टेअरिंग घेतलेल्या नागपूर विभागातील (Nagpur division) जय जगन्नाथ शिरसाट आणि भीमराव शंभरकर या एसटी कर्मचाऱ्यांच्या या भावना. साडेपाच महिन्याच्या संपाचा काही फायदा झाला नाही, असं म्हणत त्यांनी दुःखंही व्यक्त केलं. जय जगन्नाथ शिरसाट या वाहकाने पंधरा वर्षे एसटीची सेवा केली, तर भीमराव शंभरकर या चालकाने 35 वर्षे सेवा केली… साडेपाच महिन्यानंतर ते दोघेही आज एसटीच्या सेवेत रुजू (in the service of ST) झाले. त्यांच्याप्रमाणे गेल्या 24 तासांत नागपूर विभागातील 327 कर्मचारी रुजू झालेय

मंगळवारी धावल्या 333 बस

मंगळवारी मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर परतले. यात चालक 147, वाहक 124, चालक तथा वाहक 10, यांत्रिक कर्मचारी 38 आणि प्रशासन 8 असे एकूण 327 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. गेल्या 11 दिवसांत 9 ते 19 एप्रिलदरम्यान संपातील एकूण 1283 कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. यामध्ये चालक 514, वाहक 392, चालक तथा वाहक 56, यांत्रिक कर्मचारी 280 आणि प्रशासन 41 असे एकूण 1283 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. आता केवळ 145 कर्मचारी रुजू होणे बाकी आहे. नागपूर विभागातून मंगळवारी 333 बसेस धावल्या. या गाड्यांनी 1131 फेर्‍या केल्या. यातून 36 हजार 28 जणांनी प्रवास केला.

418 बसगाड्यांपैकी 189 बस नादुरुस्त

संपामुळे गेल्या पाच महिन्यांपासून कर्मचारी कामावर नव्हते. त्यामुळं गाड्यांची देखभाल दुरुस्ती झाली नाही. नागपूर विभागातील 418 बसगाड्यांपैकी 189 बस नादुरुस्त आहेत. 229 बस रस्त्यावर धावत आहेत. या गाड्या अनेक दिवसांपासून उभ्या असल्याने महामंडळाला दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागेल. या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे. कर्मचारी सेवेत रुजू होत असल्याने गाड्या दुरुस्तीलाही आता वेग येणार आहे. संपावर गेलेल्या एसटी कर्मचार्‍यांना येत्या 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. रोज कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. मंगळवारी 327 कर्मचारी नागपूर विभागातून रुजू झाले. यात 147 चालकांचा समावेश आहे.

Nagpur Water | पाण्याचा कमी दाबाने पुरवठा, पाणी चोरांवर मनपाची कारवाई, नागपुरात टिल्लू पंप जप्त

Narayan Rane | तीन पक्षांचं सरकार जूनमध्ये कोसळणार; वाशिममध्ये नारायण राणे यांनी वर्तविले भाकीत

Amravati | अचलपूर दंगल प्रकरणी अनिल बोंडेंना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकरांची मागणी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.