AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Mataram Rally : एक रुपया दानातून 35 लाखांची निधी गोळा, एक रुपया दान, कॅंसरमुक्त अभियान, 50 मुलांचा उपचार करणार

यातून 30 कॅंसरग्रस्त मुलांचा उपचार आणि 2-3कॅंसर रुग्णांच्या शस्रक्रिया करणार, असा निर्धार देवता लाईफ फाऊंडेशनने व्यक्त केलाय. कॅंसरग्रस्तांना लोकांनी मदतीसाठी पुढे यावं,

Vande Mataram Rally : एक रुपया दानातून 35 लाखांची निधी गोळा, एक रुपया दान, कॅंसरमुक्त अभियान, 50 मुलांचा उपचार करणार
एक रुपया दानातून 35 लाखांची निधी गोळा
| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 7:51 PM
Share

नागपूर : एक रुपयाला आज फारशी किंमत नाही. पण असं असतानाही कॅंसरग्रस्तांसाठी ‘एक रुपया दान कॅंसरमुक्त अभियाना’तून तब्बल 30 -35 लाख रुपये गोळा झालेय. कॅंसर रुग्णांसाठी काम करणाऱ्या नागपूरातील देवता लाईफ फाऊंडेशनने ही किमया केलीय. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त किशोर बावणे यांनी कॅंसरग्रस्तांसाठी अनोखं अभियान राबवलं, याच ‘एक रुपया दान कॅंसरमुक्त अभियाना’तून त्यांनी एका महिन्यात तब्बल 30 -35 लाख रुपये गोळा केलेय. यातून 30 कॅंसरग्रस्त मुलांचा उपचार आणि 2-3कॅंसर रुग्णांच्या शस्रक्रिया करणार, असा निर्धार देवता लाईफ फाऊंडेशनने व्यक्त केलाय. कॅंसरग्रस्तांना लोकांनी मदतीसाठी पुढे यावं, लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून, 14 ॲागस्टला लेझीम स्पर्धा आणि 15 ॲागस्टला वंदे मातरम् रॅलीचं (Vande Mataram Rally) आयोजन केलंय. अशी माहिती देवता लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे (Kishore Bavane) व उपाध्यक्ष कस्तुरी बावणे (Kasturi Bavane) यांनी दिली.

समाजानं पुढं येण्याचं आवाहन

कँसर रुग्णावरील उपचारासाठी समाजानं पुढं यावं, यासाठी देवता लाईफ फाउंडेशनकडून हा उपक्रम राबविण्यात येतोय. रस्त्यावर, नागपूर मेट्रो, राजकीय नेते, कॉलेजमध्ये जाऊन एक रुपया दान, कँसर मुक्त अभियान राबविलं जातंय. 15 ऑगस्टपर्यंत हे अभियान राबविलं जाणाराय. कँसर पीडित मुलांच्या आर्थिक मदतीसाठी एक रुपया देऊन सहकार्य करता येईल. 15 जुलैला अभियानाची सुरुवात झाली. 15 ऑगस्टपर्यंत हा उपक्रम राबविला जाणाराय. मुलांच्या औषधावर हे पैसे खर्च होणार आहेत. या पैशातून तीस कँसरग्रस्तांना मदतीसाठी लोकांनी पुढं यावं, लोकांमध्ये जनजागृती केली जाईल. त्यासाठी 14 ॲागस्टला लेझीम स्पर्धा आणि 15 ॲागस्टला वंदे मातरम् रॅलीचं आयोजन केलंय. अशी माहिती देवता फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.