नागपूर मनपाच्या परिवहन विभागाचा 384 कोटींचा अर्थसंकल्प; किती ई-बस होणार आपली बसच्या ताफ्यात दाखल?

मनपाच्या परिवहन विभागातर्फे 2021-22 चा सुधारित व 2022-23 चा प्रस्तावित अर्थसंकल्प व्यवस्थापक रवींद्र भेलावे यांनी परिवहन समितीचे सभापती जितेंद्र कुकडे यांच्याकडे सोपविला. 2021-22 च्या सुधारीत वार्षिक अर्थसंकल्पीय अंदाजात सुरुवातीची शिल्लक धरून 178 कोटी आठ लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.

नागपूर मनपाच्या परिवहन विभागाचा 384 कोटींचा अर्थसंकल्प; किती ई-बस होणार आपली बसच्या ताफ्यात दाखल?
नागपूर : रवींद्र भेलावे परिवहन विभागाचा अर्थसंकल्प सभापती जितेंद्र कुकडे यांच्याकडे सोपविताना.
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 9:32 AM

नागपूर : मनपा मुख्यालयातील परिवहन समिती (Transport Committee) सभापतींच्या कक्षात परिवहन समितीची सभा मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. यावेळी परिवहन व्यसवस्थापक रवींद्र भेलावे यांनी सदर अर्थसंकल्प समितीला सादर केला. रवींद्र भेलावे यांनी सांगितले, परिवहन सेवेच्या परिचालनाकरिता शहर परिवहन निधी तसेच महसुलाच्या जादा शिल्लकीचा विनीयोग करण्याकरिता महसूल राखीव निधी या नावाने स्वतंत्र शिर्ष उघडण्यात आलेत. परिवहन सुधारणा निधीसुद्धा स्थापन करण्यात आलेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. आपली बसचे दैनंदिन प्रवासी संख्या (Daily number of passengers) अंदाजे 71 हजार आहे. दैनिक बसेसच्या 4600 फेऱ्या सुरू आहेत. सद्यस्थितीत डिझेल, सीएनजी स्टँडर्ड बस 172, मिडी बस 141, मिनी बस 42 आणि इलेक्ट्रिकवरील महिलांच्या तेजस्विनी बस (Tejaswini bus for women) 6 अशा एकूण 361 बसेसचे संचालन सुरू आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलम्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मनपाच्या ताफ्यात 15 इलेक्ट्रिक मिडी बसचा समावेश होणार आहे.

वाठोड्यातील दहा एकर जागेवर नवीन डेपो

15व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत 2020-21 करिता 51.68 कोटी, 2021-22 करिता 25.84 कोटी असे एकूण 77.52 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. 2022-23 करिता 27.40 कोटी निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. एकूण मंजूर निधी 104.92 कोटी निधीपैकी वाठोडा येथील डेपाच्या कामाकरिता 8 कोटीची तरतूद वगळता 96.92 कोटींची तरतूद इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी करण्यात आलेली आहे. 2022-23 पर्यंत 104.92 कोटींमधून 233 मिडी बसेस खरेदी करणे प्रस्तावित आहे. 2021-22 पर्यंत प्राप्त 77.52 कोटींमधून पहिल्या टप्प्यात 115 इलेक्ट्रिक बसेस वेटलीजवर खरेदी करण्यात येणार आहे. दुस-या टप्प्यात प्राप्त निधीतून अंदाजे 100 इलेक्ट्रिक बसेस खरेदी करणे प्रस्तावित आहे. यातून 2022-23 या वर्षात नागपूर शहरात आपली बसच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी 50 टक्के बसेस या इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावतील, असा विश्वासही रवींद्र भेलावे यांनी व्यक्त केला. तसेच वाठोडा येथील 10 एकर जागेवर नवीन डेपो तयार करण्यात येणार आहे.

यावर्षात 145 कोटी रुपयांची मागणी

रवींद्र भेलावे यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात 2022-23 या वर्षाकरिता 145 कोटी निधीची मागणी केली आहे. मनपाला आतापर्यंत प्राप्त होत असलेल्या 108 कोटी अनुदानात 37 कोटी ज्यादा निधी आवश्यक आहे. 2022-23 च्या अंदाजपत्रकात 145 कोटी रुपये निधीची मागणी करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केलं. नागपूर महापालिकेतर्फे 100 इलेक्ट्रिक बसच्या संदर्भात केंद्र शासनातर्फे मंजुरी प्राप्त झाली आहे. शहर बस सेवेत येणारा दैनंदिन तोटा लक्षात घेत्या इलेक्ट्रिक बस खरेदी करिता केंद्र शासनाकडून प्राप्त होणा-या अनुदानात मनपावर पडणारा अतिरिक्त बोजा लक्षात घेता तूर्तास 40 इलेक्ट्रिक मिडी बस खरेदी करण्यात येत आहेत. 40 मिडी बसपैकी 15 बस मार्च 2022 पर्यंत शहर बस सेवेत दाखल होणार आहेत. आतापर्यंत 70 डिजेल बसचे सी.एन.जी.मध्ये रूपांतरण करण्यात आले आहे. गर्दीच्या मार्गावर आवश्यकतेनुसार जास्तच्या बस सेवा उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Nagpur NMC | नागपूर मनपा निवडणुकीची मोर्चेबांधणी, इच्छुकांचा सोशल मीडियावर धुमाकूळ, हवा कशी तयार होणार?

Melghat Fire | जंगल मे फायर नही, फ्लावर होणे चाहिये!, समाजमाध्यमांवरील पोस्टरने वेधले लक्ष; दंड काय होणार माहीत आहे का?

Video – Nagpur crime | दुकानात येऊन घातला धुडगूस, नागपुरात तोडफोड करताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.