Nagpur Crime | नागपुरात 5 दिवसांच्या बाळाची विक्री, मानव तस्करी विरोधी पथकाकडून टोळी जेरबंद
नागपुरात गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी सेलने एक मोठी कारवाई केली. 5 दिवसाच्या बाळाची विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश मिळविले. 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
नागपूर : नागपुरात पाच दिवसांच्या बाळाची विक्री 3 लाख रुपयात होणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाला (Anti-Human Trafficking Squad) मिळाली. त्यावरून पोलिसांनी कारवाईसाठी तयारी केली. बाळाची खरेदी करण्यासाठी डुप्लिकेट (Duplicates) जोडी बनवली. दलालांशी संपर्क (Contact Brokers) केला. त्यांनी पैसे घेऊन त्यांना बोलावले. त्या जोडीने पैसे देताच त्यांनी बाळ दिलं. जवळच असलेल्या पोलिसांनी धाड टाकत सगळ्या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे बाळ अवैध संबंधातून एका युवतीला झालं. मात्र तिला आपलं शिक्षण पूर्ण करायचं होतं. तेवढ्यात दलालापैकी एका महिलेने तिच्याशी संपर्क केला. ते बाळ दत्तक देता येईल असं सांगितलं आणि तिची दिशाभूल केली.
9 जणांविरोधात गुन्हा दाखल
नागपुरात गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी सेलने एक मोठी कारवाई केली. 5 दिवसाच्या बाळाची विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश मिळविले. 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती मानव तस्करी विरोधी सेलच्या पोलीस निरीक्षक नंदा मनघाटे यांनी दिली. पोलिसांच्या सातर्कतेमुळे बाळाची विक्री थांबली. कोणालाही बाळ दत्तक घ्यायचं असेल तर त्यांनी कायदेशीर प्रक्रिया करूनच घ्यावे अश्या दलालांच्या जाळ्यात फसू नये, असं आवाहन पोलिसांनी केलंय.
ते बाळ कुणाचं
एका युवतीला अनैतिक संबंधातून मूलं झालं. पण, तिला तीचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. त्यामुळं ती बाळाला पोसू शकत नव्हती. तिला एका दलालानं हेरलं. या बाळाला आपण दत्तक देऊ असं सांगितलं. त्यामुळं ती तयार झाली. एका जोडप्याला बाळ हवं होतं, त्यांनी या दलालाशी संपर्क साधला. या दलालांनी पैशाच्या मोहापायी सारी व्यवस्था केली. पण, कायदेशीर प्रक्रियेनुसार बाळ दत्तक घेता येतं. अशाप्रकारे नाही. हे समजलं. पोलिसांनी नऊ जणांच्या टोळीला अटक केली आहे. ही टोळी अशाप्रकारे दत्तक बाळ देतो म्हणून अवैध मार्गानं बाळांची तस्करी करत होती.