Nagpur Crime | 60 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर अत्याचार; दुसरीकडं शिक्षिकेची विद्यार्थिनीला मारहाण
नागपुरात दोन धक्कादायक घटना घडल्या. पहिल्या घटनेत एका साठ वर्षीय नराधनामाने सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केला. घरी कुणीच नसल्याचं पाहून त्याची नियत फिरली. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दुसऱ्या घटनेत एका शिक्षिकेनं विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याची तक्रार तिच्या आईनं केली आहे.
नागपूर : नागपुरात सहा वर्षाच्या चिमुकलीवर जबरी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. घरी कुलर दुरुस्तीसाठी आलेल्या इलेक्ट्रिशियननं (Electrician) हा प्रकार केलाय. देवदास नामदेव वाघमारे असं या नाराधमाचं नाव आहे. देवदास वाघमारे हा 60 वर्षांचा आहे. चिमुकली फक्त सहा वर्षीची आहे. चिमुकलीची आजी आणि आई दोघेही कामासाठी बाहेर गेले होते. कुलर दुरुस्तीसाठी देवदास आला होता. 29 मार्च रोजी दुपारी तो त्यांच्या घरी कुलर आला. चिमुकलीची आई आणि आजी कामावर गेल्या होत्या. देवदासची वाईट नजर चिमुकलीवर गेली. तिला त्याने घरात आणले. आतून दार बंद केले. यानंतर या नरधमाने तिच्यावर अत्याचार केला. कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. देवदास कुलर दुरुस्त (Cooler Repair) न करताच निघून गेला. चिमुकलीची आई आणि आजी संध्याकाळी घरी परतल्या. चिमुकलीने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या आई आणि आजीने अजनी पोलीस (Ajni Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
शिक्षिकेची विद्यार्थिनीला मारहाण
दुसऱ्या घटनेत, शिक्षिकेने विद्यार्थिनीला बेदम मारहाणीची घटना इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. सहा वर्षाच्या समायराला शिकवणी लावून दिली. 1 मार्चपासून ती रामबाग कॉलनी येथील एका शिक्षिकेकडे शिकवणीला जाते. समायराची आई ममता गणेश राहुलकर जाऊ वैशाली यांनी 26 मार्चला समायरला शिकवणीच्या वेळेनुसार शिक्षिकेच्या घरी सोडले. समायराची शिकवणी दुपारी पूर्ण झाल्यानंतर आई ममता या समायराला घेऊन शिकवणीत पोहचल्या. यावेळी त्यांना समायरा रडताना दिसून आली. परिणामी, त्यांनी तिला ती का रडते असे विचारले. यावेळी समायरा हिने दुकानात ती गेली नाही म्हणून शिक्षिकेने रागाच भरात हाताने तोंडावर आणि पाठीवर मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर ममता यांनी थेट इमामवाडा पोलिसात या शिक्षिकेविरूद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर समायराच्या सांगण्यानंतर तिची मेडिकलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या विद्यार्थिनीची प्रकृती बरी आहे.