विदर्भातील रस्त्यांसाठी 831 कोटींची कामे मंजूर, केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांची घोषणा
विदर्भातील रस्ते विकासासाठी 831 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात 2 हजार 252 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे. अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
नागपूर : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत बांधण्यात येणाऱ्या महामार्गाच्या कामाना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात विदर्भातील तीन प्रकल्पांचा समावेश आहे. गडचिरोली, कुरखेडा आणि बुलडाणा येथील रस्त्यांची कामे होणार आहेत. यामुळे दळणवळण व्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रातील NH-753H वरील भोकरदन ते कुंभारी फाटा आणि राजूर ते जालना विभाग या 26.07 किमी रस्त्याचे 2-लेन तसेच 4-लेनमध्ये पुनर्वसन व अपग्रेडेशन (Rehabilitation and Upgradation) करण्यात येणार आहे. यासाठी 291 कोटी 7 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. विदर्भातील रस्ते विकासासाठी (Road Development in Vidarbha) 831 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी (Project Approval) देण्यात आली आहे. महाराष्ट्रात 2 हजार 252 कोटी रुपयांच्या कामाचा समावेश आहे. अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
पाथरी ते सेलू विभाग
महाराष्ट्रातील NH-548B वरील इंजेगाव – सोनपेठ – पाथरी – सेलू – देगाव फाटा रस्त्याच्या पाथरी ते सेलू विभाग (6.09 किमी) आणि सेलू ते देवगाव फाटा विभाग (5.60 किमी) ही कामे होणार आहेत. 2-लेन तसेच 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यात येणार आहे. यासाठी 145 कोटी 76 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली पोस्ट
कुरखेडा शहरातील महामार्गाचे अपग्रेडेशन
विदर्भातील कुरखेडा शहरातील सध्याच्या महामार्गाचे 4-लेनमध्ये पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यात येणार आहे. शंकरपूर – गुरनुली विभागात 2-लेन रस्ता व भुती नाला आणि सती नदीवर मोठे पुलाचे काम करण्यात येणार आहे. तसेच NH-543 भाम्हापुरी – वडसा – कुरखेचा – कोरची – देवरी – आमगाव रस्ता व लेंधारी पुल या छोट्या पुलाच्या बांधणीला EPC मोडवर 163 कोटी 86 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.