Chandrasekhar Bavankule | पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या बावनकुळेंवर गुन्हा; कोविड सूचनांचे उल्लंघन केले?

नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन केले. पण, आंदोलनादरम्यान बावनकुळे यांनी कोविड नियमांचे पालन केले नाही, असा ठपका ठेवत बावनकुळे यांच्याविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Chandrasekhar Bavankule | पटोलेंवर गुन्हा दाखल करावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या बावनकुळेंवर गुन्हा; कोविड सूचनांचे उल्लंघन केले?
चंद्रशेखर बावनकुळे, आमदार
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 6:12 AM

नागपूर : मोदींना मारण्याची भाषा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. त्यानंतर भाजपनं ठिकठिकाणी आंदोलनं केलीत. विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी कोराडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. त्यावेळी तिथं गर्दी होती. बावनकुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोविड नियमांचे पालन केले नाही. असा ठपका ठेवत प्रशासनाने बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळं प्रशासनाच्या विरोधात भाजपचा रोष वाढला आहे. एकीकडं आमदार कृष्णा खोपडे यांना पॉझिटिव्ह असताना आंदोलनात कसे सहभागी झाले. याचे स्पष्टीकरण मागण्यात आले. महापालिकेने खोपडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तर दुसरीकडं बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून भाजपची मुस्कटदाबी सुरू केली आहे.

बावनकुळे यांच्याविरोधात गुन्हा काय?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी कोराडी पोलीस ठाण्यासमोर गर्दी जमवली. कोविड मार्गदर्शन सूचनांचे उल्लंघन केले. त्यामुळे बावनकुळे यांच्यावर कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बावनकुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले होते. आता न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा इशारा बावनकुळे यांनी दिला होता.

भाजपचे आंदोलन कशासाठी?

नाना पटोले यांनी भंडाऱ्यातील जेवणाळा येथे मोदींना मी मारू शकतो, मी शिव्या देऊ शकतो असे कार्यकर्त्यांसोबत बोलताना म्हटले. तो व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर मोदी म्हणजे नरेंद्र मोदी नव्हे, तर तो गावगुंड मोदी असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. पण, भाजपनं नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, यासाठी राज्यभर आक्रमक भूमिका घेतली. ठिकठिकाणी आंदोलनं केली. ग्रामीण भागातील कुहीसह विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी तक्रारी दाखल केल्या. कोराडी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले होते.

NMC Election | नागपूर भाजपात कोण करतंय गुलाम बनविण्याचा प्रयत्न; अविनाश ठाकरे यांच्या पोस्टने खळबळ, पोस्ट नेमकी काय?

Gondia ZP Election | प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; काँग्रेसच्या नाना पटोले यांनाही धक्का!

Bhandara ZP Election | भंडाऱ्यात 21 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष, सत्तेच्या समीकरणासाठी काय करावं लागणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.