नागपुरात सात वर्षे कॅन्सरची भीती घेऊन जगली महिला; शस्त्रक्रिया केल्यावर निघाले भलतेय काही!

कॅन्सरचे नाव घेतल्यानंतर भले भले घाबरतात. अशीच एक घटना नागपुरात घडली. कॅन्सरच्या भीतीने या महिलेने तब्बल सात वर्षे काढले. पण, शस्त्रक्रिया केल्यावर फुफ्फुसात भलतीच वस्तू सापडली.

नागपुरात सात वर्षे कॅन्सरची भीती घेऊन जगली महिला; शस्त्रक्रिया केल्यावर निघाले भलतेय काही!
शस्त्रक्रियेनंतर फुफ्फुसातून काढण्यात आलेली वस्तू.
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 3:16 PM

नागपूर : नागपुरातील एका सत्तीस वर्षीय महिलेला (Thirty-seven year old woman) दोन-तीन वर्षांपासून खोकल्याचा त्रास (Coughing for three years) होता. गेल्या तीन महिन्यांत खोकला आणखीच वाढला. काही डॅाक्टरने छातीच्या कॅन्सरची (The doctor diagnosed breast cancer) शक्यताही वर्तवली. कॅन्सरची भीती घेऊन महिला जगत होती. नागपुरातील श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी तपासणी केली, तर हा कॅन्सर नव्हे छातीत लवंग अडकल्याचे निदान झाले. अद्ययावत यंत्राच्या मदतीने त्यांनी तब्बल सात वर्षांपूर्वी छातीत अडकलेली लवंग शस्त्रक्रिया करून बाहेर काढली. लवंग डाव्या फुप्फुसाच्या खालच्या भागात अडकून होती. निदान झाले नसते तर फुप्फुसाचा हा भाग कापावा लागला असता. पण महिला वेळेत आली. आणि शस्रक्रिया करुन लवंग बाहेर काढल्यानंतर रुग्णाला पूर्ण आराम मिळालाय.

फुफ्फुसातून काढण्यात आली लवंग

कॅन्सर या आजाराचं नावही घेतलं तरी धडकी भरते. नागपुरातील 36 वर्षीय महिलेला डॉक्टरांनी कॅन्सर असल्याचं सांगितलं. सात वर्षे कॅन्सर झालाय या भीतीनं जगली. मात्र, या महिलेच्या फुफ्फुसात लवंग असल्याचं निदान झालं. ही लवंग डॉक्टरांनी काढल्यावर ही महिला ठणठणीत झालीय. त्यामुळं आता ती सामान्य व्यक्तीसारखे आयुष्य जगत आहे. छातीचा कॅन्सर असल्याचं तिला सांगण्यात आले होते. पण, प्रत्यक्षात घडले मात्र वेगळेच.

योग्य निदान गरजेचे

काही डॉक्टर अंदाज व्यक्त करतात. असं झाल्यास असं होऊ शकतो, अशी शक्यता असते. पण, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या चाचण्या करणे गरजेचे असते. या महिलेने आधीच योग्य चाचण्या केल्या असत्या तर कदाचित योग्य निदान झाले असते. कारण कळू शकले असते. आपल्याला कॅन्सर झाला असेल, मग आपले कसे होईल. आता उपचार कसे करावे, असे असंख्य प्रश्न या महिलेच्या मनात निर्माण झाले होते. परंतु, शस्त्रक्रिया केल्यानंतर तिचे सगळ्या शंका दूर झाल्या.

Vande Mataram | नागपुरात वंदे मातरम् उद्यानाचे आज भूमिपूजन, जाणून घ्या उद्यानाची काय राहणार विशेषता

दरोड्याच्या उद्देशाने घरावर आठ ते दहा जणांचा हल्ला; फायरिंगही केली, घटना सीसीटीव्हीत कैद

गाडी चालवताना भीती वाटते? Simulator समोर बिनधास्त सराव करा, नागपूर RTO ची भन्नाट डोकॅलिटी

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....