electric shock | पतंगाच्या मागे धावला नि होत्याचे नव्हते झाले; नागपुरात विजेच्या धक्क्याने गमावला जीव! 

महिन्याभरापूर्वी लग्न झाले. सुखाचा संसार सुरू होता. पतंगोत्सव आला. पतंगाच्या मागे धावला. त्यात युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना नागपुरातील कळमना भागात काल घडली.

electric shock | पतंगाच्या मागे धावला नि होत्याचे नव्हते झाले; नागपुरात विजेच्या धक्क्याने गमावला जीव! 
पतंगापासून अपघात होऊ नये, म्हणून वाहतूक व्यवस्था सुरळीत करताना पोलीस.
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 9:35 AM

नागपूर : विजयनगरात राहणारा तुलेश साहू (24) वॉटर प्रुफिंगचे काम करीत होता. त्याच्या कुटुंबात आईवडील, पत्नी आणि तीन विवाहित बहिणी आहेत. तुलेशचे महिनाभरापूर्वी नताशासोबत लग्न झाले होते. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता तो आपल्या घराच्या गच्चीवर उभा होता. त्यावेळी त्याची नजर घराच्या छतावरून गेलेल्या हायटेंशन लाईनमध्ये अडकलेल्या पतंगावर गेली. तुलेशने पतंग काढण्यासाठी पडद्याचा पाईप काढला. पाईपच्या मदतीने तो पतंग काढत होता. पाईप हायटेंशन लाईनला लागल्यामुळे तुलेशला विजेचा धक्का लागला. तो जमिनीवर पडून बेशुद्ध झाला. तुलेशला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

19 हून अधिक जण जखमी

शुक्रवारी मकर संक्रांतीच्या दिवशी शहरात सर्वत्र आकाशात पतंगांची चलती होती. या पतंगीच्या मांज्यामुळे 19 हून अधिक जण जखमीही झालेत. या सर्वांवर शहरातील मेयो, मेडिकल येथे उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. पतंगबाजी करताना इतरांची पतंग कापण्यासाठी मुले काचाचा वापर केलेला मांजा तसेच घातक अशा चायना मांजाचा वापर करतात. हा चायना मांजा नायलॉन मीश्रित असल्याने न तुटणारा धारदार असा असतो. त्यामुळे त्याला पतंगबाजांची अधिक पसंती असते. शहरात या चायना व साध्या मांजाने पक्षी व मनुष्य जखमी होण्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. शुक्रवारी अशाप्रकारे मांज्याने अनेक जण जखमी झालेत.

आठ पक्षी जखमी, एकाचा मृत्यू

पर्यावरणप्रेमी व महापालिकाने शहरवासीयांना आवाहन केल्यावरही शहरात सर्रास नायलॉन मांजाचा वापर सुरू आहे. या वापरामुळे शहरात संक्रातीच्या पर्वावर कित्येक पक्षी गंभीर जखमी झालेत. जखमी अवस्थेत आठ पक्षी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला आणल्या गेलेत. यातील एकाचा मृत्यू झाला. सात पक्ष्यावंर शस्त्रक्रिया करण्यात आली. जखमी पक्ष्यांत कुणाचे गळे चिरले, पाय कटले तर कुणाचे पंख छाटल्या गेले. ब्लॅक काईट, गरुड, बगळा, जंगली कबूतर, पिंगळा, डव, ढोक आणि अतिशय दुर्मिळ असा ब्लॅक स्ट्रोक या पक्ष्यांचा यात समावेश आहे. यात कुणाचे गळे चिरले, पाय कटले तर कुणाचे पंख छाटले गेले. यशोधरानगर पोलिस स्टेशन, एसआरपीएफ हिंगणा परिसरातील व मंगळवारी येथून जखमी पक्ष्यांना ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला आणण्यात आले. यशोधरा पोलिस स्टशनचे सुनील टेकाडे यांनी मांजात गुंडाळलेला अतिशय दुर्मिळ असा ब्लॅक स्ट्रोक हा पक्षी आणला. या जखमी पक्ष्यावर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर येथे डॉ. सय्यद बिलाल अली, डॉ. मयूर काटे यांनी या जखमी पक्ष्यांवर उपचार केलेत तर सौरभ सुखदेवे व सिद्धांत मोरे यांनी त्यांना सहकार्य केले.

Nagpur Crime | प्रेयसीसाठी चोर बनलेला पोलिसांना धक्का मारून पळाला; जंगलात कसे केले सर्च ऑपरेशन?

Nagpur RTO | वाहन नोंदणी व नूतनीकरणाचे नवीन दर 1 एप्रिल लागू होणार, जाणून घ्या नवे दर

Nagpur School | सरसकट शाळाबंदीच्या निर्णयाला विरोध, शिक्षणाची जिम्मेदारी घेणार कोण ?, प्रा. सचिन काळबांडे म्हणतात…

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.