Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election | नागपुरात आप कुणाचा वाढविणार ताप; मनपा निवडणुकीत पहिल्यांदाच अजमावणार जोर

2019 च्या विधानसभेत आप नागपुरात जोर दाखवू शकले नाही. आता आपचे कार्यकर्ते जोरात दिसतात. नागपूर मनपात ते कुणाचा ताप वाढवितात की, पुन्हा फ्लाप होतात, ते पाहावे लागेल.

NMC Election | नागपुरात आप कुणाचा वाढविणार ताप; मनपा निवडणुकीत पहिल्यांदाच अजमावणार जोर
नागपूर महापालिका
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 6:18 AM

नागपूर : दिल्लीतील आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) नागपूर मनपाच्या निवडणुकीत (Nagpur Municipal Corporation elections) उतरणार आहे. नागपूर लोकसभेत 2014 साली आपने लक्ष वेधून घेतले होते. 2019 च्या विधानसभेत मात्र आप नागपुरात जोर दाखवू शकले नाही. आता आपचे कार्यकर्ते जोरात दिसतात. ते कुणाचा ताप वाढवितात की, पुन्हा फ्लाप होतात, ते पाहावे लागेल. भ्रष्टाचाराविरोधात आपने दिल्लीत लढा दिला. अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या यांनी 2014 मध्ये नागपुरातून लोकसभेत आपकडून लढल्या. दमानिया या विदर्भातील नव्हत्या. तरीही मतदारांनी त्यांना 69 हजार 81 मते दिली. विशेष म्हणजे दक्षिण पश्चिम नागपुरातून त्यांना तब्बल 14 हजार 313 मते मिळाली होती.

आपचे कार्यकर्ते विखुरलेत

2017 मध्ये आप महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्यक्ष उतरली नाही. पक्षाकडून कुणालाही स्पष्ट पाठिंबा दिला गेला नव्हता. त्यामुळं पक्षाचे कार्यकर्ते विखुरले गेले होते. 2019 मध्ये महाराष्ट्रात आपने विधानसभेच्या 25 जागा लढवल्या. यात नागपुरातील दक्षिण पश्चिम आणि ग्रामीणमधील रामटेक मतदार संघाचा समावेश होता. मात्र, आपच्या उमेदवारांना फारशी मते घेता आली नाही. दक्षिण पश्चिममध्ये अमोल हाडके यांनी एक हजार 125 मते मिळविली होती. रामटेकमध्ये तर 834 मतांवर ईश्वर गजबे यांना समाधानी राहावे लागले होते. गेल्या काही दिवसांत शहरात आप काही फारसे सक्रिय असल्याचे दिसत नाही.

तेव्हा आणि आता फरक

अंजली दमानिया उभ्या असताना त्यांनी संघटन मजबूत केले होते. त्यामुळं त्यांना चांगली मते मिळाली होती. परंतु, सध्या आपचे संघटन फारसे काही मजबूत दिसत नाही. काही मोजके कार्यकर्ते उभेच्छुक आहेत. पण, तीन सदस्यीय प्रभाग असल्यानं एक-दोन सक्रिय कार्यकर्त्यांच्या भरोशावर निवडणूक जिंकता येणे शक्य नाही. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी असावे लागते. तशी फळी आपकडे सध्या तरी नागपुरात दिसत नाही.

Smart City | नागपूर स्मार्ट सिटीच्या शिरपेचात मानाचा तुरा!, स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजसाठी पुरस्कार

Action | नागपुरात कोविड नियमांचे उल्लंघन, तीन लॉनवर कारवाई; मास्कशिवाय फिरणारेही रडारवर

Nagpur Police | चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात; नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल व्हावा, यासाठी करत होते आंदोलन

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.