AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात एसीबीची मोठी कारवाई, चार लाखांची लाच घेताना अधिकारी, सीए जाळ्यात! प्रकरण काय आहे?

चार लाखांची लाच घेताना 'सीजीएसटी'च्या सहआयुक्त आणि एका सीएला अटक करण्यात आली. सीबीआयच्या एसीबीने (अँटी करप्शन ब्युरो) ही कारवाई केली. सेवा कर दायित्वाशी संबंधित प्रकरणात एका कंत्राटदाराला लाच मागितली होती.

नागपुरात एसीबीची मोठी कारवाई, चार लाखांची लाच घेताना अधिकारी, सीए जाळ्यात! प्रकरण काय आहे?
अवैद्यरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्यावर कारवाईImage Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 9:38 AM
Share

नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने (एसीबी) केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे (सीजीएसटी) (Central Goods and Services Tax Department) सहआयुक्त व चार्टर्ड अकाउंटंट यांना चार लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. यवतमाळचे जयंत चौपाणे या कंत्राटदाराला चार लाखांची लाच मागितली होती. सीजीएसटीचे सहआयुक्त मुकुल पाटील (Joint Commissioner Mukul Patil) आणि सीए हेमंत राजंडेकर असं अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत. सेवा कर दायित्वाशी संबंधित प्रकरणात लाच मागितली होती. कंत्राटदाराला सेवा कर दायित्वाशी संबंधित कारणे दाखवा नोटीस (Show cause notice) बजावण्यात आली होती. मुकुल पाटील यांनी हेमंत राजंडेकर यांच्या माध्यमातून लाचेची मागणी केली होती. आरोपी पाटील यांना दोन महिन्यांपूर्वीच पदोन्नती मिळाली होती. त्यांच्याकडे सीजीएसटीमध्ये कस्टम विभागात जबाबदारी सोपविण्यात आली होती.

सीएने लाच घेतल्यानंतर सहआयुक्ताला दिली माहिती

यवतमाळ येथील जय इलेक्ट्रिल्सचे ठेकेदार जयंत चौपाणे यांचे प्रकरण पाटील यांच्याकडे सुनावणीसाठी होते. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी सीए हेमंत राजंदेकर यांच्या माध्यमातून चार लाख रुपये देण्याचे निश्‍चित झाले. ठेकेदार जयंत चौपाणे गुरुवारी सायंकाळी अजनी चौकातील सीएच्या कार्यालयात पोहोचला. सीएने चार लाख रुपये लाच घेतली. तसेच याची माहिती मुकुल पाटील याला दिली. यानंतर सीबीआयच्या पथकाने राजंदेकरला ताब्यात घेतले.

जीएसटी कार्यालयात खळबळ

सीबीआयचे पथक राजंदेकरला घेऊन सिव्हिल लाईन येथील जीएसटी कार्यालयात पोहोचले. अतिरिक्त मुकुल पाटील याला अटक करण्यात आली. जीएसटी नागपूर कार्यालयात सुपर क्लास वन श्रेणीतील अधिकार्‍याला अटक झाली. त्यानंतर त्याच्या निवासस्थानीही झडती घेण्यात आली. पाटील तीन वर्षापूर्वी गुजरात येथून बदली होऊन नागपुरात आला होता. दोन्ही आरोपींना शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयात सादर केले जाईल. सीबीआयचे अधीक्षक एम. एस. खान यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

बाबांनी विवाह ठरवला, तरुणीचा प्रियकरामागे लग्नासाठी तगादा, संतापलेल्या बॉयफ्रेण्डचं टोकाचं पाऊल

पाचव्या मजल्यावरुन लिफ्टच्या खड्ड्यात पडला, नाशकात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Uttar Pradesh Murder : लग्नात झालेल्या भांडणाचा दोन वर्षांनी हत्या करुन घेतला बदला

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.