Nagpur accident | बांधकामाच्या ठिकाणी वर्षभराच्या चिमुकलीला ठेवले, सिमेंटच्या ट्रकनं केला तिचा चेंदामेंदा!
सुमन ही वर्षभराची मुलगी. आईसोबत बांधकामावर आली होती. आई कामात व्यस्त होती. एवढ्यात सिमेंटचा ट्रक आला. त्या ट्रकनं चिमुरडीला चिरडले. यात घटनास्थळीच तिच्या कोवळ्या शरीराचा चेंदामेंदा झाला. कपीलनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे.
नागपूर : पोटाची खडगी भरण्यासाठी महिला मजूर बांधकामावर गेली. घरी वर्षभराच्या मुलीला सांभाळणार कुणी नव्हतं. म्हणून त्या चिमुकलीला तीनं सोबत घेतलं. दुपारी दूध पाजून चिमुकलीला बाजूला ठेवलं. अचानक सिमेंटनं भरलेला ट्रक आला. ट्रकचालकाला चिमुकली दिसलीच नाही. ट्रकच्या चाकाखाली वर्षभराच्या चिमुकलीचा चेंदामेंदा झाला.
अशी घडली घटना
सुमन ही वर्षभराची मुलगी. आईसोबत बांधकामावर आली होती. आई कामात व्यस्त होती. एवढ्यात सिमेंटचा ट्रक आला. त्या ट्रकनं चिमुरडीला चिरडले. यात घटनास्थळीच तिच्या कोवळ्या शरीराचा चेंदामेंदा झाला. कपीलनगर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे.
ट्रकचालकाला चिमुकली दिसलीच नाही
पांझरा ले-आउट इथं राहणारी राजकुमारी राजकुमार कुंभरे ही उप्पलवाडी येथे कामावर गेली. घरी मुलीला पाहणारे कुणीच नसल्यानं तीनं सुमन या एक वर्षाच्या चिमुकलीला बांधकामाच्या ठिकाणी सोबत घेतलं. आईनं मुलीला आपलं लक्ष पुरेल येवढ्या अंतरावर ठेवलं. पण, बुधवारी दुपारी अचानक सिमेंट घेऊन एक ट्रक आला. ट्रकचालकाला चिमुकली दिसलीच नाही. त्यानं सरळ बांधकामाच्या ठिकाणी ट्रक लावला. तेवढ्यात ती एक वर्षाची चिमुकली ट्रकखाली आली.
कोळसा पुरविणाऱ्या बेल्टला आग
खापरखेडा : खापरखेडा वीजनिर्मिती केंद्र 210 मेगावॅटमध्ये मंगळवारी कोळसा हाताळणी विभागाच्या कन्व्हेयर बेल्टला आग लागली. आगीने वीज केंद्राचे आर्थिक नुकसान झाले. केबलमुळे शॉटसर्किट झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. बायलरला कोळसा पुरवठा करणाऱ्या मुख्य बेल्टला सहा एबी कन्व्हेयरमधून काळा धूर निघाल्यानंतर आग लागली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच वीजनिर्मिती केंद्राच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. एका तासात आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. मात्र तोपर्यंत कन्व्हेअर बेल्ट जळालेले होते. शिवाय कन्व्हेअर बेल्टच्या बाजूने असलेले जिवंत केबल सुद्धा जळलेले असल्याची माहिती आहे. बेल्ट जळताना त्याखाली असणाऱ्या एडरल पुल्ल्याखाली कोसळल्या.