Nagpur | मनपाचे प्रशासक पद आयुक्तांकडे; नगरसेवक, महापौर झाले माजी, प्रतीक्षा निवडणूक जाहीर होण्याची

नागपूर महापालिकेत गेल्या निवडणुकीत 151 नगरसेवक निवडून आले होते. सध्या हे नगरसेवक माजी झाले आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून चार मार्चपर्यंत नागपूर मनपात भाजपची सत्ता होती. आता पाच मार्चपासून प्रशासकांच्या हातात सत्ता आली आहे. निवडणुकीची चाहूल लागली आहे. येत्या चार-पाच महिन्यात निवडणुका होतील, अशी सध्यपरिस्थिती आहे.

Nagpur | मनपाचे प्रशासक पद आयुक्तांकडे; नगरसेवक, महापौर झाले माजी, प्रतीक्षा निवडणूक जाहीर होण्याची
नागपूर मनपाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 6:30 AM

नागपूर : शहरात 1864 साली नगरपालिका स्थापन झाली. लोकप्रतिनिधींना सिमित अधिकार प्राप्त झाले. प्रारंभी साफ-सफाई दिवाबत्ती, बाजार, प्राथमिक शिक्षण यासाठी शासकीय अनुदानातून नागरी सोयी उपलब्ध करून दिल्या जातं. त्यावेळी नागपूर नगरपालिकेचे क्षेत्र 15.5 चौ. कि.मी. होते. 82 हजार एवढी लोकसंख्या होती. 1922 मध्ये नगरपालिकेची सर्व कामे मध्यप्रांत व-हाड नगरपालिका अधिनियम तयार करण्यात आले होते. मार्च 1951 साली नागपूर मनपाची स्थापना झाली. गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेत (Municipal Corporation) भाजपची सत्ता आहे. पाच मार्चला नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्ठात आला. त्यामुळं मनपात सध्या प्रशासक लागले आहेत. मनपा आयुक्त राधाकृष्णन यांच्याकडं प्रशासक पदाची धुरा आहे. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरू नगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसिनगर, मंगळवारी अशी झोन कार्यालयं आहेत. मालमत्ता कर, भरती आणि सार्वत्रिक निवडणूक ( General Election) अशी महत्वाची संकेतस्थळ (Website) आहेत.

असे आहेत विभाग

नागपूर महापालिकेत प्रशासकीय, सामान्य प्रशासन, समाज विकास, कर, आरोग्य (घनकचरा व्यवस्थापन) असे विभाग आहेत. तसेच उद्यान व वृक्ष, शिक्षण, नगर रचना, वित्त व लेखा, लेखा परीक्षण, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, विद्युत, पर्यावरण, शहर वाहतूक असे वेगवेगळे विभाग आहेत.

मनपा आयुक्त प्रशासकीय प्रमुख

नागपूर मनपातर्फे मालमत्ता कर, पाणी शुल्क, स्थानिक संस्था कर, ई निविदा, जन्म आणि मृत्यू, इमारत योजना, रुग्णालय नोंदणी, दिव्यांग आदी सेवा पुरविल्या जातात. महापौर, उपमहापौर, सचिवालय, स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेता, विरोधी पक्षनेता अशी महत्वाची पदाधिकारी असतात. परंतु, नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानं ही पदे संपुष्ठात आली आहेत. सध्या प्रशासकीय सर्व जबाबदारी पाच मार्चपासून मनपा आयुक्तांकडं आली आहे. मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. हे प्रशासकीय प्रमुख आहेत. नागपूर मनपातील फायर ब्रिगेड, मनपा अधिकारी, हेरिटेज कंझर्वेशन समिती याठिकाणी ऑनलाईन तक्रारी नोंदविण्याची सुविधा नागपूर मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी येथे साधा संपर्क

नागपूर महानगरपालिका. महानगर पालिका मार्ग, सिव्हिल लाईन्स, नागपूर, महाराष्ट्र, भारत, 440 001 दूरध्वनी : 0712 2567035 फॅक्स : 0712 2561584 E-mail : mconagpur@gov.in/ nmcnagpur@gmail.com / nmcngp.media@gmail.com अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर संपर्क साधता येईल. https://www.nmcnagpur.gov.in/

देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणी खुल्या कोर्टात सुनावणी

सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू

Satish Uke ED Raid | नागपुरातील वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांविरोधातील याचिकेमुळे चर्चेत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.