नागपूर महापालिकेवर प्रशासक, मुदत संपल्याने शनिवारपासून आयुक्त सांभाळणार धुरा, निवडणुकांबाबत अनिश्चितता

नागपूर महापालिकेची मुदत 4 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे मनपाचे नगरसेवक आता माजी होणार आहेत. 5 मार्चपासून मनपाची सूत्रे प्रशासक आयुक्त राधाकृष्णन यांच्या हाती असतील. प्रशासकपदाची जबाबदारी आयुक्तांकडेच देण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे.

नागपूर महापालिकेवर प्रशासक, मुदत संपल्याने शनिवारपासून आयुक्त सांभाळणार धुरा, निवडणुकांबाबत अनिश्चितता
नागपूर महापालिकेची धुरा शनिवारपासून मनपा आयुक्त राधाकृष्णन प्रशासक म्हणून पाहतील.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 10:20 AM

नागपूर : मार्च-एप्रिल 2022 मध्ये मुदत संपत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self Government Institutions) सार्वत्रिक निवडणुका वेळेत घेणे शक्य नाही. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपताच तेथे प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार (Provisions in Municipal Corporation Act) मनपाची मुदत ही पहिल्या बैठकीपासून जास्तीत जास्त पाच वर्षांची आहे. ही मुदत नागपूर मनपाची चार मार्च 2022 रोजी संपत आहे. त्यामुळं येथे प्रशासकपदी आयुक्त (Commissioner as Administrator) यांची नियुक्ती करण्यात येत आहे. असे आदेश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत.

52 प्रभागांत 156 सदस्य

नागपूर मनपा निवडणुकीची तयारी प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर करण्यात आला. तीन सदस्यीय प्रभाग पद्धत डोळ्यासमोर ठेवून एकूण 52 प्रभागांत नागपूर शहराची विभागणी करण्यात आली. नव्या रचनेनुसार सदस्य संख्या 156 असेल. 78 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. 26 जागेवर 2 महिला उमेदवार राहील. तर 31 जागा अनुसूचित जाती, 12 जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित, प्रवर्गासाठी आरक्षित असेल. नागपूर महापालिकेची मुदत 4 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे मनपाचे नगरसेवक आता माजी होणार आहेत. 5 मार्चपासून मनपाची सूत्रे प्रशासक आयुक्त राधाकृष्णन यांच्या हाती असतील. प्रशासकपदाची जबाबदारी आयुक्तांकडेच देण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे.

ओबीसी इच्छुक उमेदवारांना फटका

नागपूर महापालिका निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवायच होण्याची शक्यता आहे. महापालिकेतील ओबीसींसाठी राखीव 34 जागा खुल्या प्रवर्गात जाणार आहेत. महापालिकेत नवीन प्रभाग रचनेनुसार एकूण 156 जागांपैकी 34 जागा ओबीसींसाठी राखीव होत्या. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भातील अंतरिम अहवाल फेटाळल्याने आरक्षणाशिवायच निवडणुका होण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या जागा खुल्या प्रवर्गामध्ये वर्ग होणार असल्याने खुल्या प्रवर्गाच्या जागा वाढणार आहेत. ओबीसींच्या इच्छूक उमेदवारांना बसणार मोठा फटका बसणार आहे.

बाबांनी विवाह ठरवला, तरुणीचा प्रियकरामागे लग्नासाठी तगादा, संतापलेल्या बॉयफ्रेण्डचं टोकाचं पाऊल

पाचव्या मजल्यावरुन लिफ्टच्या खड्ड्यात पडला, नाशकात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Uttar Pradesh Murder : लग्नात झालेल्या भांडणाचा दोन वर्षांनी हत्या करुन घेतला बदला

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.