तालिबान्यांची ‘किल लिस्ट’, तीन ते चार लाख नागरिकांना अमेरिकेचे ‘खबरी’ म्हणून मारणार?

गेल्या 20 वर्षांत अफगाणिस्तानमधील ज्या अफगाणी नागरीकांनी अमेरिकेसह मित्र देशांच्या सैनिकांना मदत केली, असे तीन ते चार लाख लोक आहेत. आता तालिबानी या लोकांना खबरे म्हणून मारतील, अशी भीती सुरक्षा तज्ज्ञ निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केलीय.

तालिबान्यांची 'किल लिस्ट', तीन ते चार लाख नागरिकांना अमेरिकेचे 'खबरी' म्हणून मारणार?
तालिबान
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 4:27 PM

नागपूर: अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात आल्यानंतर तिथे दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या 20 वर्षांत अफगाणिस्तानमधील ज्या अफगाणी नागरीकांनी अमेरिकेसह मित्र देशांच्या सैनिकांना मदत केली, असे तीन ते चार लाख लोक आहेत. आता तालिबानी या लोकांना खबरे म्हणून मारतील, अशी भीती सुरक्षा तज्ज्ञ निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केलीय. सध्या तालीबान्यांच्या ताब्यात अफगानमधील सर्व एक्झिट पॅाइंट असल्याने, तिथल्या नागरिकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात पळण्याशिवाय पर्याय नाही. सध्या अफगानीस्थानमधील स्थिती अंधकारमय आहे. असंही अभय पटवर्धन म्हणाले

पाहा व्हिडीओ

स्वातंत्र्य जाणार

अफगाणिस्तानमध्ये अतिशय भीषण परिस्थिती आहे. गेली वर्ष अफगाणिस्तान तालिबानच्या कचाट्याबाहेर होता. गेल्या वीस वर्षात लोकांना, महिलांना जे स्वातंत्र्य मिळालं होतं ते जाण्याची भीती वाटत आहे. तालिबानचं जे वागणं वीस वर्षांपूर्वी होतं. ते आताही असेल. तालिबानी शरियत लावतील, असं पटवर्धन यांनी सांगितलं.

1978 ची पुनरावृत्ती होणार ?

अमेरिका आणि नाटोच्या सैन्याला अफगाणिस्तानातील तीन ते चार लोक आहेत जे खबरे म्हणून मदत करायचे. त्यामुळे तालिबानाचे लोक त्यांना मारतील, अशी शक्यता आहे. अफगाणिस्तानातील लोक एका शहरातून किंवा दुसऱ्या शहरात पळू शकतील. जे लोक अमेरिकेला मदत करत होते त्यांच्यासाठी अमेरिकेनं काहीही केलं नाही. अमेरिकेनं अफगाणिस्तानच्या लोकांना तालिबानच्या तोंडात दिलेलं आहे. अफगाणिस्तानी नागरिक जे अमेरिकेला मदत होते त्यांची माहिती तालिबानकडे आहे. 1978 मध्ये तालिबाननं जे केले ते केलं तेच यावेळी करतील, अशी शक्यता असल्याचं अभय पटवर्धन म्हणाले.

अफगाणिस्तानमधील नागरी हवाई वाहतूक बंद करण्यात आलीय.तिथे फक्त अमेरिका आणि मित्र देशांनी त्यांची हेलिकॉप्टर्स तिथं पाठवली आहेत. अमेरिका आणि फ्रान्स, जर्मनी यांची हेलिकॉप्टर्स अफगाणिस्तानला जात आहेत. भारताचं सी-17 विमानं तिथं जातील. अफगाणिस्तानातून पहिल्यांदा राजदूत कार्यालायतील कर्मचारी, तंत्रज्ञ यांना पहिल्यांदा बाहेर काढलं जाईल. तोपर्यंत इतर सामान्य देशांच्या नागरिकांना धोका आहे.

अफगाणिस्तानचं भवितव्य अंधकारमय

अफगाणिस्तानच्या पूर्ण सीमा तालिबाननं सील केल्या आहेत. पाकिस्तान, इराणकडं त्यांना जाता येत नाही. त्यामुळे हवाई मार्गानं जाण्याचा ते प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानमधील तालिबानला चीन, रशियानं मान्यता दिलीय. भारत, अमेरिका आणि पाश्चिमात्य देश तालिबानला मंजुरी देणार नाहीत.

भारत, पाकिस्तान यांच्यातीलं संबंध सध्यासारखे नॉर्मल राहतील. तालिबाननं भारत करत असलेल्या प्रकल्पांना धोका पोहोचवणार नाही, असं म्हणतंय पण त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. अफगाणिस्तानचं भवितव्य अंधकारमय दिसतंय, असं अच्युत पटवर्धन म्हणाले.

इतर बातम्या:

Taliban Crisis : काबूलमधील परिस्थितीनंतर भारताने सुरू केला ई-आणीबाणी एक्स-मिस्क व्हिसा, जाणून घ्या याबाबत

Afghanistan Crisis: ज्या विमानात बसण्यासाठी एसटीसारखी झुंबड उडाली, विमानात काय स्थिती होती? व्हायरल फोटो पाहिले का?

Afghanistan Crisis Security expert Abhay Patwardhan said Taliban will kill three to four lakh Afghan people who help America

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.