Agniveer : नागपुरात अग्निवीर सैन्य भरती मेळावा, विदर्भातील 10 जिल्ह्यातील तरुण होणार सहभागी

उमेदवारांच्या सुरक्षिततेसाठी तसेच आपातकालीन वैद्यकीय सेवेसाठी महापालिका व जिल्हा परिषद प्रशासनातर्फे वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, Emergency Medicine Kit उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहे.

Agniveer : नागपुरात अग्निवीर सैन्य भरती मेळावा, विदर्भातील 10 जिल्ह्यातील तरुण होणार सहभागी
नागपुरात अग्निवीर सैन्य भरती मेळावा
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 2:43 PM

नागपूर : अग्निवीर (Agniveer) भरती प्रक्रिया 17 सप्टेंबर रात्री बारापासून नागपुरात सुरु होणार आहे. सात ॲाक्टोबरपर्यंत ही भरती प्रक्रिया चालणार आहे. यासाठी विदर्भातील (Vidarbha) एकूण 10 दहा जिल्हयातून 60 हजार उमेदवार नागपुरात येणार आहेत. यासाठी नागपूर प्रशासनाचे संबंधित सर्व कार्यालये सैन्य भरती मेळावा -2022 साठी सज्ज आहेत. जिल्हानिहाय वेळापत्रकानुसार येणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया रात्री 10 वाजता मैदानावर सुरू होईल. सैन्य भरती (Army Recruitment) कार्यालयाच्या पूर्वनियोजित पद्धतीनुसार भरती प्रक्रिया पार पाडली जाईल. या ठिकाणी कडेकोड बंदोबस्त असेल. निवड प्रक्रिया पूर्ण होत असलेल्या ठिकाणी प्रवेशपत्र असणाऱ्या उमेदवाराशिवाय कुणाला प्रवेश राहणार नाही.

या जिल्ह्यातील उमेदवारांचा समावेश

अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूर अशा दहा जिल्हयातील उमेदवार या मेळाव्यात सहभागी होतील. उमेदवारांना भरती मैदानावर ने-आण करण्यासाठी, नागपूर महापालिकेने सीटी बसेसची सुविधा self-paid तत्वावर उपलब्ध करुन दिलीय. नागपुरातील मानकापूर क्रीडा संकुलात ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी दिली.

मानकापूर स्टेडियमवर भरती मेळावा

जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन या भरती मेळाव्याच्या यशस्वितेसाठी कार्यरत आहे. सैन्य भरती कार्यालय नागपूरचे संचालक यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी आढावा बैठकी घेण्यात आल्या. जिल्हा प्रशासनातर्फे विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर सैन्य भरती प्रक्रियेसाठी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यात सैन्यातर्फे येणाऱ्या 150 सेवारत कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

वाहन व्यवस्था कस्तुरचंद पार्कवर

बाहेरील जिल्हयातून येणाऱ्या उमेदवारांना नागपूरपर्यंत पोहोचवण्यासाठी MSRTC (महाराष्ट्र परिवहन) च्या तर्फे pay and use तत्वावर विशेष बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्या संबंधित माहिती उमेदवारांनी त्यांच्या जिल्हयाच्या बस स्थानकावर उपलब्ध करावी. येणाऱ्या उमेदवारांची स्व:ताची वाहने आणली असल्यास त्याच्यासाठी वाहनतळाची व्यवस्था कस्तुरचंद पार्कमध्ये करण्यात आली आहे. उमेदवाराला मैदानावर सोडून वाहन चालकांनी रस्त्यावर गर्दी न करता थेट कस्तुरचंद पार्कमध्ये आपली वाहने पार्क करावी. रस्त्यावर वाहने उभी करू नये असे आवाहन आहे.

येणाऱ्या सर्व उमेदवारांना थांबण्यासाठी विभागीस क्रीडा संकुल, मानकापूर गेट क्रं- 1 च्या आतील बाजुला असलेल्या पार्कीग मैदानावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानावर पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट यांची मुबलक सुविधा करण्यात आली आहे. संकुलाच्या आवारात Self-Paid खाण्याचे स्टॅाल्स उपलब्ध असतील त्याचा उमेदवार लाभ घेऊ शकतात. जे उमेदवार उत्तीर्ण होऊन मेडीकल चाचणीकरिता थांबतील त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे जेवनाची नि:शुल्क सेवा देण्यात येणार आहे.

उमेदवारांच्या सुरक्षिततेसाठी तसेच आपातकालीन वैद्यकीय सेवेसाठी महापालिका व जिल्हा परिषद प्रशासनातर्फे वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका, Emergency Medicine Kit उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहे. नागपूर पोलीस प्रशासनातर्फे कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस विशेष शाखा व वाहतूक नियंत्रण शाखा यांच्याकडून व्यवस्था करण्यात येत आहे.

महापालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पाणीपुरवठा विभाग, वैद्यकीय विभाग तसेच परीवहन विभागातर्फे सैन्य भरती मेळाव्या दरम्यान आवश्यक असलेल्या सगळया सुविधा वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...