“संजय राऊत यांचा डोकं तपासून घ्यावं लागेल, त्यांचं बोलणं एकही खरं झालं नाही”; शिवसेनेच्या नेत्यानं राऊतांच्या टीकेला किंमत दिली नाही…

बोटावर मोजणारे आमदार खासदार बरोबर घेऊन ते काय करु शकणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर संजय शिरसाट आणि सुषमा अंधारे यांच्या पेटलेल्या वादावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं आहे.

संजय राऊत यांचा डोकं तपासून घ्यावं लागेल, त्यांचं बोलणं एकही खरं झालं नाही; शिवसेनेच्या नेत्यानं राऊतांच्या टीकेला किंमत दिली नाही...
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 6:01 PM

नागपूर : राज्यात शिंदे-फडणवीस गटाची सत्ता येऊन दहा महिने होत आले तरीही शिवसेना आणि ठाकरे गटाचे आरोप-प्रत्यारोप अजूनही थांबले नाहीत. राज्यातील राजकारणात आता वेगळाच मुद्दा चर्चेत आला आहे. राज्याचा भावी मुख्यमंत्री पदावरून आता रस्सीखेच लागली आहे. अजित पवार, जयंत पाटील तर दुसरीकडे भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी करून आपलाच नेता भावी मुख्यमंत्री होणार असल्याचे चित्र निर्माण केले आहे. त्यावरूनच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविषयी बोलताना सांगितले की, विखे पाटील माझे मित्र आहेत, पण त्यांच्याविषयी अशा अफवा विनाकारण पसरवल्या गेल्या आहेत.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच काम उत्कृष्ट आहे, ज्याला मुख्यमंत्री पद देतात त्याला 145 चा आकडा गाठावा लागणाप आहे.

त्याचबरोबर त्यांचा हा कार्यकाळ पूर्ण होईल तसेच 2024 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालीच मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढू असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

तर मागील पंचवीस वर्षांपूर्वी ते माझे मित्र आहेत, पण एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून काढा आणि विखेना मुख्यमंत्री बनवा असं मी कधी बोललोच नाही आणि कधी बोलणारही नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत सावध रहा असं म्हणाले असले तरी त्यांनी मुख्यमंत्र्यांना खुर्चीपासून सावध राहा असं ते म्हणाले नाहीत. येणाऱ्या 2024 मध्येसुद्धा तेच मुख्यमंत्री राहतील अशी माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं आणि त्यांच्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य माणसाला कृषिमंत्र्याची खुर्ची मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळीही खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांचं डोकं तपासून घ्यावं लागेल, कारण ते आजपर्यंत जे जे बोलले आहेत, ते एकही खरं झालं नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे ‘मंगेरी लाल के हसीन सपने आहेत’ मात्र ते कधीही पूर्ण होणार नाही असंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जेव्हा सत्ता होती तेव्हा त्यांनी काही केलं नाही, आणि आता काय करणार आहेत असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. जोपर्यंत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, तोपर्यंत त्यांना काहीही होणार नाही.

बोटावर मोजणारे आमदार खासदार बरोबर घेऊन ते काय करु शकणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर संजय शिरसाट आणि सुषमा अंधारे यांच्या पेटलेल्या वादावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं आहे.

यावेळी अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल सरकारकडून योग्य ती मदत जाहीर करण्यात आल्याची माहितीही अब्दुल सत्तार यांनी सांगितली. शेतकऱ्यांचा विचार करूनच सरकारने शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये विमा ही राज्यात योजना राबवल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.