Maharashtra Budget 2022 : गोसेखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार, विदर्भासाठीच्या पाच महत्त्वाच्या घोषणा काय?

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द हा विदर्भातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 850 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. यंदा राज्यातील 11 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं ते म्हणाले.

Maharashtra Budget 2022 : गोसेखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार, विदर्भासाठीच्या पाच महत्त्वाच्या घोषणा काय?
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 3:30 PM

नागपूर : भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द (Gosekhurd in Bhandara district) हा विदर्भातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 850 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केली. यंदा राज्यातील 11 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं ते म्हणाले. शिवाय पुढील दोन वर्षांत 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात 24 हजार 614 सिंचन विहिरींचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील पोहरा (Pohra in Amravati district) येथे शेळी समूह क्षमता वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यातील प्रत्येक विभागात समूह शेळी प्रकल्प राबविला जात आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नवजात शिशू रुग्णालयांची स्थापना करण्यात येईल. बैलगाड्या शर्यतीला आता परवानगी मिळाली आहे. उत्तम, सुदृढ गोवंशाची पैदास करण्यात येणार असल्याचं पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं. शेती आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी या शर्यती सुरू राहाव्यात. यासाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिल्याचं ते म्हणाले.

कवी विठ्ठल वाघांच्या शब्दात…

अजित पवार म्हणाले, कवी विठ्ठल वाघ यांच्या शब्दात सांगायचं तर बैल घामाची प्रतीमा, बैल घामाचे प्रतीक, बैल माझ्या शिवारात काढी हिरवे स्वस्तिक. विदर्भात कापूस व सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या शेतकऱ्यांची उत्पादकता प्रगतशील शेतकऱ्यांबरोबर करण्यासाठी तसेच मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

विदर्भासाठीच्या पाच महत्त्वाच्या घोषणा

  • गोसेखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटी रुपये उपलब्ध करून देणार
  •  देशी गायींची पैदास वाढावी यासाठी विदर्भात तीन मोबाईल प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार
  • अमरावती आणि गडचिरोली येथे विमानतळाची घोषणाही अजित पवार यांनी केली
  • यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, भंडारा येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रुग्णालये स्थापन करण्यात येईल
  • अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे शेळी समूह क्षमता वाढ करण्याचा निर्णय

Maharashtra Budget 2022 : शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, विमानतळाची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2022 : नाशिकसह 3 ठिकाणी वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण संस्था; जाणून घेऊ अर्थसंकल्पातील 5 महत्त्वाच्या घोषणा

Maharashtra Budget Session 2022: ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये बळीराजा केंद्रस्थानी, शेती समृद्धीसाठी अजित पवारांच्या मेगा प्लॅनमधल्या 10 मोठ्या घोषणा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.