‘हे धंदे बंद करा’, अजित पवारांनी सभागृहात जयंत पाटलांची बोलती केली बंद

विधीमंडळात आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच शाब्दिक टोलेबाजी झाली. विदर्भाच्या मुद्द्यावरुन दोन्ही बाजूच्या नेत्यांनी परस्पारांना टोले, टोमणे लगावले. यावेळी एक महत्त्वाची गोष्ट बघायला मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाला विदर्भाच्या मुद्द्यावरुन टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यावर प्रत्युत्तर देताना जयंत पाटील यांनी अजित पवारांचा उल्लेख केला. त्यानंतर अजित पवारांनी अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. त्यांची भूमिका ऐकून जयंत पाटील शांतपणे जागेवर बसले.

'हे धंदे बंद करा', अजित पवारांनी सभागृहात जयंत पाटलांची बोलती केली बंद
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 6:03 PM

नागपूर | 20 डिसेंबर 2023 : विधीमंडळाचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाचा शेवटचा दिवस हा चांगलाच दणकेबाज ठरताना दिसतोय. कारण सत्ताधारी आणि विरोधकांनी आज सभागृहात एकमेकांना चांगलेच टोले, टोमणे लगावले आणि फटकेबाजी केली. हिवाळी अधिवेशन हे विदर्भात होत आहे, त्यामुळे विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा होणं जास्त अपेक्षित आहेत. त्यामुळे सरकारकडून आज विदर्भाचा प्रस्ताव मांडण्यात आला. पण विरोधकांकडून हा प्रस्ताव मांडायला हवा होता, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. यावेळी विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी कालच्या बैठकीतील कारण देत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख केला. यानंतर अजित पवारांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली.

“विदर्भाचा विषय सत्तारुढ पक्षाने मांडल्यामुळे आम्ही मांडला नाही. अर्थमंत्र्यांनी काल बीएसीमध्ये सांगितलं की, आम्ही हा प्रस्ताव वेळ नसेल तर विथड्रॉ करतो, आता अध्यक्ष महोदय अजून सभागृह संपलेलं नाही. त्यामुळे चर्चा होणार आहे, असं आम्ही गृहित धरुन आहोत. दहा दिवसांचं अधिवेशन घ्यायचं, तिकडून दोन प्रस्ताव, इतकडून एक प्रस्ताव, एवढं लिमिटेड का? म्हणून आम्ही म्हणत होतो, एक महिना अधिवेशन घ्या. आम्हालाही आणखी दिवस नागपूरची हवा घेऊ द्या. (यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या जागेवरुन उठतात आणि भूमिका मांडतात, त्यावर जंयत पाटील बोलू लागतात) दोन मिनिट माझं झालेलं नाही. दोघात बसून ठरवा की कोण बोलायचं, बसून ठरवा”, असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

‘कसं कुणी बोलायचं ते आम्हाला कळतं’, अजित पवारांनी ठणकावून सांगितलं

जयंत पाटील यांचे हे बोल अजित पवार यांच्या चांगल्याच जिव्हारी लागले. त्यांनी अतिशय आक्रमक आणि मोठ्या आवाजात आपली भूमिका मांडायला सुरुवात केली. “बसून ठरवायचं काही कारण नाही. आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. कसं कुणी बोलायचं ते आम्हाला कळतं. अध्यक्ष महोदय, कामगार सल्लागार समितीत वेळ कमी होता. अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला. त्यावेळेस विरोधी पक्षाला कळलं होतं की, अधिवेशन संपणार आहे. त्यांनी अध्यक्षांना सांगायचं होतं की, आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचं नाही. इकडे वेगळं बोलायचं आणि बाहेर वेगळं बोलायचं, हे धंदे बंद करा”, असं अजित पवार म्हणाले.

जयंत पाटील शांत जागेवर बसले

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर जयंत पाटील शांतपणे आपल्या जागेवर बसले. ते फक्त ऐकत राहिले. तर अजित पवार आक्रमकपणे पुढे आपली भूमिका मांडत राहिले. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की, विदर्भाचं उत्तर आलंच पाहिजे, तो विदर्भाचा अधिकार आहे, म्हणून आम्ही विधान परिषदेत प्रविण दरेकर यांना सांगितलं की, तुम्ही विदर्भाचा प्रस्ताव मांडा. त्यांनी आज तो प्रस्ताव मांडला आहे. मला प्रसाद लाड यांनी सांगितलं की, विदर्भाचे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्याचं काम प्रविण दरेकर यांनी केलं आहे. त्यावर देवेद्र फडणवीस उत्तर देणार आहेत. ते उत्तर फक्त विधान परिषदेपुरता नाही तर संपूर्ण विदर्भाच्या जनेतासाठी उत्तर आहे”, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं.

देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा विरोधकांवर निशाणा

अजित पवारांनी भूमिका मांडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा विदर्भाच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला. “जयंतराव मी या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून देतो, आपण जसा पहिला प्रस्ताव दिला, आमचा प्रस्ताव हा शेतकऱ्यांबद्दल होता, तरी तुम्ही शेतकऱ्यांचा प्रस्ताव दिलाच ना? जयंतराव म्हातारी मेल्याचं दु:ख आहेत, पण म्हातारी मेल्यापेक्षा काळ जास्त सुकावत चाललाय याचं दु:ख जास्त आहे. विरोधी पक्षाला विदर्भात येऊन विदर्भाचा विसर पडावा, याचं दु:ख अधिक आहे. पण आम्हाला विदर्भाचा विसर पडलेला नाही”, असा टोला फडणवीसांनी लगावला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.