आभा पांडे आजच राष्ट्रवादीत, पालिकेतून थेट विधानसभेत नेण्याचा अजित पवारांचा शब्द?

"आभा ताई तुमचं भाषण ऐकून मला वाटतं, तुमची गरज महापालिकेत नाही तर विधानसभेत आहे", असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. (Ajit Pawar speech at Nagpur Abha Pande NCP enter program)

आभा पांडे आजच राष्ट्रवादीत, पालिकेतून थेट विधानसभेत नेण्याचा अजित पवारांचा शब्द?
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 8:31 PM

नागपूर : “आभा ताई तुमचं भाषण ऐकून मला वाटतं, तुमची गरज महापालिकेत नाही तर विधानसभेत आहे”, असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. नागपुरातील ज्येष्ठ अपक्ष नगरसेविका अभा बिज्जू पांडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचा आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल उपस्थित आहेत. तर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी अजित पवार यांनी आभा पांडे यांची विधानसभेला गरज असण्याबाबतचं वक्तव्य केल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांना पक्ष प्रवेश करताना पालिकेतून थेट विधानसभा तिकीटाचं आश्वासन दिलंय की काय? असा प्रश्न निर्माण झालाय (Ajit Pawar speech at Nagpur Abha Pande NCP enter program).

अजित पवार भाषणात नेमकं काय म्हणाले?

“आभा पांडे आज पक्षात प्रवेश करत आहेत, त्याचा मोठा आनंद आहे. आतापर्यंत अपक्ष असताना सुद्दा त्यांच्या मागे मोठा जनसमुदाय आहे, ते या सभेवरून दिसून येते”, असं अजित पवार म्हणाले (Ajit Pawar speech at Nagpur Abha Pande NCP enter program).

“गुंड प्रवृत्तीच्या लोकांना भाजपच्या काळात महामंडळ दिली. नागपुरात गुंडगिरी वाढली होती. भाजपच्या या महापालिकेत भ्रष्टाचार होत आहे. इथे संडास सुद्धा कागदावरून गायब होतात”, असा दावा अजित पवार यांनी केला.

“उपराजधानीचं शहर आहे, हे स्वच्छ शहर असलं पाहिजे. केंद्रापासून राज्यात सुद्धा भाजपच्या काळात मोठी मंत्रालय होते. त्यांनी शहरासाठी काय केलं? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ज्या महापालिकेने कमी वयाचा महापौर म्हणून सन्मान दिला, त्यांनी या राज्यात असताना या महापालिकेचे प्रश्न सोडवले का? महापालिकेतील भ्रष्टाचार झालेला असेल तर पुरावे मला द्या मी चौकशी लावतो. जे मला करता येत नाही तो शब्द मी देत नाही”, असं अजित पवार म्हणाले.

“विदर्भात आम्ही माणसं जोडण्याचं काम करत आहोत. आम्ही अधिवेशननंतर आणखी दौरे करू. पदवीधरमध्ये शिकल्या सवरल्या लोकांनी भाजपला नाकारलं. शेतकऱ्यांसाठी काही करण्यापेक्षा त्यांच्या रस्त्यात खिळे ठोकले जातात. केंद्र सरकार त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा करायला तयार नाही. पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. हे सरकार नेमकं कोणासाठी काम करतंय? गरिबांसाठी की श्रीमंतासाठी?”, असा सवाल त्यांनी केला.

“माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आता राष्ट्रवादी ला साथ द्या आता तुमच्याकडे नेते आहेत. भाजपच्या काही मंडळींना सुद्धा वाटते परिवर्तन व्हावं. भाजपचे काही लोक आपल्या पक्षात येण्यास तयार आहेत”, असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा : शिवसेना संपलीय किंवा संपवतो म्हणणाऱ्याला राऊतांचं थेट उत्तर, काँग्रेस नेते नाराज होणार? 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.