AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar | सावनेरमध्ये अजित पवार यांची मोठी घोषणा; पोलिसांना एक लाख घरे बांधून देणार, घरांसाठी गृहकर्जही देणार

पोलिसांना एक लाख घरे बांधून देण्याचा महाविकास आघाडीचा मानस आहे. पोलीस विभागास घरासाठी शासनातर्फे गृहकर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar | सावनेरमध्ये अजित पवार यांची मोठी घोषणा; पोलिसांना एक लाख घरे बांधून देणार, घरांसाठी गृहकर्जही देणार
सावनेरमध्ये पोलीस प्रशासकीय इमारत व पोलीस निवासस्थानाचे उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर. Image Credit source: tv 9
| Updated on: Apr 30, 2022 | 11:24 AM
Share

नागपूर : कायदा व सुव्यवस्था कायम ठेवतानाच जनतेची कामे सुलभ व्हावीत. या नूतन इमारतीमुळे कार्यक्षमता वाढून गतीने काम करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल येथे केले. सावनेर येथील सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेल्या पोलीस प्रशासकीय इमारत व पोलीस निवासस्थानाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार (Sunil Kedar), जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, पशुसंवर्धन व कृषी सभापती तापेश्वर वैद्य, महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोंढारे, पोलीस गृहनिर्माण कल्याण मंडळाचे महासंचालक विवेक फणसळकर, अपर पोलीस महासंचालक श्रीमती अर्चना त्यागी, पोलीस उपमहानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजय मगर आदी उपस्थित होते.

पोलीस प्रशासकीय इमारतीने सावनेरच्या सौंदर्यात भर

कायदा व सुव्यवस्था राखण्याची उत्तम जबाबदारी सांभाळत असताना विभागाने निष्पक्ष काम करताना द्वेषभावना न ठेवता व समाजात तेढ निर्माण होईल. असे न वागता सामोपचाराने काम करण्याच्या सूचना करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पोलीस प्रशासकीय इमारत सावनेरच्या सौंदर्यात भर घालणारी आहे. सर्वसामान्य जनतेला उत्कृष्ट सेवा मिळेल. या दृष्टीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे काम करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील पोलीस विभागाची परंपरा व नावलौकिक संपूर्ण देशभर आहे. ते वेळोवेळी सिद्ध झाले आहे. राज्याची उज्ज्वल परंपरा कायम ठेवून सर्वांनी काम करावे, असेही ते म्हणाले.

कॅम्युनिटी हॉल बांधण्यास मंजुरी

कोरोना महामारीमध्येही विकासकामांना खिळ बसू दिली नाही. नवीन पायाभूत सुविधा निर्माण केल्या. त्याचबरोबर राज्यातील पोलीस विभागाच्या इमारत बांधकामास सुध्दा निधीची कमतरता पडू दिली नाही. त्यामुळे आज ही इमारत उभी असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासकीय इमारत व निवासस्थानाच्या ठिकाणी कॅम्युनिटी हॉल बांधण्यास मंजुरी देण्यात येत आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. सतत विकासाचा ध्यास ठेवल्यामुळे ही प्रशासकीय इमारत व इतर सोयी सुविधा पूर्ण करण्यात आल्या. पोलिसांनी प्रामाणिकपणे काम करुन जनतेस सौजन्याची वागणूक द्यावी, असे ते म्हणाले. पोलिसांना एक लाख घरे बांधून देण्याचा महाविकास आघाडीचा मानस आहे. पोलीस विभागास घरासाठी शासनातर्फे गृहकर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

5,200 पोलिसांची भरतीप्रक्रिया पूर्ण

पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासंदर्भात बोलताना गृहमंत्री म्हणाले की, 5 हजार 200 पोलिसांची भरतीप्रक्रिया पूर्ण होत आहे. दुसऱ्या टप्प्यात सात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. राज्यातील जुन्या व मोडकळीस आलेल्या पोलीस स्टेशनच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. पोलिसांना गृहनिर्माणासाठी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. समाजातील विविध घटकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.