Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर शहरातील भोसलेकालीन सर्व विहिरींचे संवर्धन होणार; महापालिकेची नेमकी योजना काय?

स्थानिक नागरिकांना निःशुल्क शुद्ध पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी पाच रुपयात वीस लिटर पिण्याचे पाणी मिळेल अशी व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे.

नागपूर शहरातील भोसलेकालीन सर्व विहिरींचे संवर्धन होणार; महापालिकेची नेमकी योजना काय?
आरो प्लांटचे भूमिपूजन करताना महापौर दयाशंकर तिवारी.
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 4:50 AM

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणावर (Environment) विशेष भर देण्यात येत आहे. पर्यावरणाचाच एक भाग म्हणून शहरातील भोसलेकालीन जलस्रोतांचे संरक्षण (Protection of water resources) आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. जलस्रोतांच्या संवर्धनासोबतच स्थानिक नागरिकांना निःशुल्क शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. या हेतूने शहरातील जुन्या भोसलेकालीन सर्व विहिरींची स्वच्छता करून त्यावर आरओ प्लांट उभारण्यात येणार आहे. आरोग्य समिती (Protection of water resources) सभापती महेश (संजय) महाजन यांच्या प्रभाग क्रमांक एकवीसमधील लालगंज येथील 425 वर्षे जुन्या चोरपावली विहिरीवर उभारण्यात येत असलेल्या आरओ प्लांटचे महापौरांनी भूमिपूजन केले.

आरओ प्लांट बसविण्यात येणार

महापौर म्हणाले, शहरातील जुने जलस्रोत जगले पाहिजे. या जलस्रोतांमुळे नवीन पिढीला जुनी व्यवस्था समजून घेता येईल. या जलस्रोतांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी रविवारी चोर पावली विहिरींची सफाई करण्यात आली. तसेच विहिरीचे पाणी वापरात यावे आणि नागरिकांना सुद्धा याचा फायदा व्हावा या दृष्टीने या ठिकाणी आरओ प्लांट बसविण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांना निःशुल्क शुद्ध पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी पाच रुपयात वीस लिटर पिण्याचे पाणी मिळेल अशी व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे. नागरिकांना कमी दरात पाणी मिळेल आणि यातून आरओ प्लांटची देखभाल करण्यासही मदत होईल.

पाच रुपयात वीस लिटर पाणी

बाहेर एक लिटर पाणी वीस रुपयाला विकत घ्यावे लागते. मात्र मनपातर्फे पाच रुपयात वीस लिटर पाणी देण्यात येणार आहे. येत्या काळात शहरातील सर्व भोसलेकालीन ऐतिहासिक विहिरींवर अशा प्रकारचे आरओ प्लांट उभारण्यात येणार असल्याचे, महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. हा प्रकल्प प्रभाग एकवीसचे नगरसेवक महेश (संजय) महाजन यांनी यांच्या प्रयत्नाने साकार होत आहे. प्रभाग क्र. एकवीसचे नगरसेवक यांच्या बारा लाख रुपयांच्या निधीतून या विहिरीची सफाई करण्यात आली. या विहिरीवर बसविण्यात आलेले आरओ प्लांट एका तासाला एक हजार लिटर पाणी शुद्ध करणार आहे.

Nagpur Pollution | नांदगाव येथील राखेचे प्रदूषण कमी होणार काय?; आदित्य ठाकरेंनी बोलावली बैठक, टि्वटवरून दिली माहिती

नागपुरात दोघांना जलसमाधी; सरपण गोळा करायला गेली नि कृष्णा नदीत दोन बालकं बुडाली

Nagpur | शेतकऱ्यांनो, तुम्हाला माहीत आहे काय?; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणतात, शेळ्या-मेंढ्यांपासून कोंबड्यांचाही काढता येतो विमा

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.