Marathi Sahitya Sammelan | 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांची घोषणा

उदगीर येथे एप्रिल 2022 मध्ये 95 वे मराठी साहित्य संमेलन झालं. विदर्भ साहित्य संघाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. त्यामुळं 96 वे संमेलन विदर्भात व्हावे, अशी महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने ईच्छा व्यक्ती केली. या संमेलनासाठी वर्धा हे नाव संमेलनस्थळासाठी सुचविले.

Marathi Sahitya Sammelan | 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांची घोषणा
96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यातImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 12:55 PM

नागपूर : 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात होईल, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. उषा तांबे यांनी जाहीर केले. काल नागपुरात महामंडळाची बैठक झाली. त्यात हे निर्णय घेण्यात आले. दोन दिवसांपूर्वी महामंडळाची स्थळ निवड समिती वर्ध्याला जाऊन आली. वर्ध्यातील मैदाने आणि वाहन तळाची पाहणी केली. ती साहित्य संमेलन घेण्यासाठी योग्य असल्याचे पाहून स्थळ निवड समितीने वर्ध्यात पुढचे साहित्य संमेलन घेण्यात यावे, अशी शिफारस (Recommendation) केली. 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्यात यावे अशी मागणी विदर्भ साहित्य संघानेही केलीच होती. त्या अनुषंगाने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पुढचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यात घेण्याचे निश्चित केल्याचे डॉ. उषा तांबे (Usha Tambe) म्हणाल्या. वर्ध्यातील स्वावलंबी महाविद्यालयाच्या मैदानावर (Swavalambi Mahavidyalaya Maidan) हे साहित्य संमेलन पार पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023 संमेलन होण्याची शक्यता

संमेलनाच्या तारखा अजून निश्चित झालेल्या नाही. मात्र, नोव्हेंबरपासून फेब्रुवारीदरम्यान संमेलन घेण्याचे नियोजित आहे. गोव्यात होणाऱ्या मार्गदर्शक मंडळाच्या आगामी बैठकीत संमेलनाच्या तारखा निश्चित होईल, असेही डॉ. उषा तांबे म्हणाल्या. जानेवारी किंवा फेब्रुवारी 2023 मध्ये संमेलन घेण्यात येण्याची शक्यता आहे, असंही त्या म्हणाल्या. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सचिव उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस विलास मानेकर, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, वर्धेचे शाखा समन्वयक प्रदीप दाते, अकोल्याचे डॉ. गजानन नारे, पुण्याचे प्रकाश होळकर व औरंगाबादचे किरण सगर उपस्थित होते.

घटनास्थळाची करण्यात आली पाहणी

उदगीर येथे एप्रिल 2022 मध्ये 95 वे मराठी साहित्य संमेलन झालं. विदर्भ साहित्य संघाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. त्यामुळं 96 वे संमेलन विदर्भात व्हावे, अशी महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने ईच्छा व्यक्ती केली. या संमेलनासाठी वर्धा हे नाव संमेलनस्थळासाठी सुचविले. उषा तांबे म्हणाल्या, महामंडळाच्या स्थळ निवड समितीने शनिवारी वर्धा येथे भेट दिली. तेथील मैदाने, वाहनतळ, पुस्तक प्रदर्शनांचे स्थळ आणि निवास व्यवस्था यांची पाहणी करण्यात आली. अखिल भारतीय संमेलनासाठी वर्धा हे स्थळ योग्य आहे. असा अहवाल स्थळ निवड समितीने रविवारी विदर्भ साहित्य संघात झालेल्या बैठकीत दिला. त्या अहवालाला मंजुरी देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.