शिंदे-फडणवीस सरकारने लव्ह जिहादची आकडेवारी द्यावी, असउद्दीन ओवैसी यांचे आव्हान

शिंदे-फडणवीस यांनी लव्ह जिहाद प्रकरणाची आकडेवारी द्यावी. तसेच जातीय दंगली होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अकोला, अमरावती, मालेगावात जातीय दंगली झाल्या, असाही आरोप ओवैसी यांनी केला.

शिंदे-फडणवीस सरकारने लव्ह जिहादची आकडेवारी द्यावी, असउद्दीन ओवैसी यांचे आव्हान
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 5:25 AM

नागपूर : मी जेव्हा इकडे यायला निघालो तेव्हा मला कोणीतरी विचारलं की तुम्ही कुठे चालले, तर मी सांगितलं की नागपूरला चाललो. ते म्हणाले आरएसएसच्या नागपूरला चालले आहात, तर मी म्हटलं नाही मी ताजुद्दीन बाबांच्या नागपूरला चाललो आहे. मी त्या नागपूरला चाललेलो आहोत जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे, असं सांगितल्याचं एमआयएमचे नेते असउद्दीन ओवैसी यांनी सांगितले.

ओवैसी म्हणाले, शिंदे-फडणवीस यांनी लव्ह जिहाद प्रकरणाची आकडेवारी द्यावी. तसेच जातीय दंगली होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अकोला, अमरावती, मालेगावात जातीय दंगली झाल्या, असाही आरोप ओवैसी यांनी केला.

नागपुरात दोन विकास प्राधिकरणे

नागपुरात दोन विकास प्राधिकरणे आहेत. एक मनपा आणि दुसरं म्हणजे नागपूर सुधार प्रन्यास. जिथे दलित वस्त्या आणि मुस्लीम बसले आहेत तिथे विकास होत नाही. पिण्याचे पाणी स्वच्छ येत नाही. जेव्हा तुम्ही विकासाच्या नावावर टॅक्स गोळा करता तेव्हा तुमची ती जबाबदारी आहे की तुम्ही सर्वांना एक समान न्याय द्यावा, असंही ओवैसी यांनी म्हंटलं.

हे सुद्धा वाचा

माझं नागपूरवासियांना आव्हान आहे की, मजलेस मुस्लिमइन म्हणजेच एएमआय याला मजबूत करा. लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही एमआयएमला मजबूत करणार नाही तेव्हापर्यंत तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत.

हल्ला करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

महाराष्ट्रात जातीय दंगली उफाळून आलेले आहेत. मालेगाव, अमरावती इतर ठिकाणी नगर, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी या दंगली उफाळून आल्या आहेत. अकोल्यामध्ये मरकजी मज्जितवर हल्ला करण्यात आला. पुस्तकांना जाळण्यात आले. यवतमाळच्या दारवामध्ये कस्तोडियल मृत्यू झालेला आहे. पोलिसांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले. अकोल्यामध्ये दंगा झाला मात्र अकोल्यातील पोलीस अधीक्षक मुस्लीमच्या कार्यकर्त्यांना भेटायलाही तयार नाही. त्यामुळे अकोल्यातील मरकजी मज्जितवर हल्ला करणाऱ्यांवर अजूनपर्यंत कारवाई करण्यात आली नाही, असाही आरोप त्यांनी केला.

म्हणून अनुचित प्रकार घडला नाही

औरंगाबादमध्येदेखील हिंदू आणि मुसलमानांमध्ये दंगा करण्याची प्रयत्न केला गेला. ज्याने स्क्रिप लिहिले ते कोणाला आणखी हिरो बनवणार होते. मात्र इम्तियाज जलील यांनी पूर्ण स्क्रिप्टला भावपूर्ण सुपरस्टार बनले. हिंदू मंदिरावर कुठलीही आच आणू दिली नाही. ते तीन तास बसून राहिले. मात्र मजलीसच्या प्रयत्नामुळे औरंगाबादमध्ये कुठे अनुचित प्रकार घडला नाही, असंही ओवैसी यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.