Nagpur Crime | नवीन मित्रांना द्यायचा चोरीचे प्रशिक्षण, अट्टल चोराचा साथीदार अटकेत; मुख्य आरोपीला केव्हा होणार अटक?

नवीन नवीन मित्र पकडून त्यांना चोरीच प्रशिक्षण देत चोरी करणाऱ्या टोळीतील एका गुन्हेगाराला सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे. तो घर चालविण्यासाठी चोरी करत असल्याचं तपासात पुढे आलं.

Nagpur Crime | नवीन मित्रांना द्यायचा चोरीचे प्रशिक्षण, अट्टल चोराचा साथीदार अटकेत; मुख्य आरोपीला केव्हा होणार अटक?
आरोपीला अटक करणारी सोनेगाव पोलिसांची टीम
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 2:43 PM

नागपूर : सोनेगाव (Sonegaon) पोलीस स्टेशन, बजाजनगर पोलीस स्टेशन, बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नवीन नवीन मित्रांना सोबत घेऊन चोरी करण्याचा सपाटा प्रणव ठाकरेने (Pranab Thackeray) लावला होता. मात्र सोनेगाव पोलिसांनी पंकज उरकुडे नावाच्या आरोपीला अटक केली. या टीमचा भांडाफोड झाला. दोघांनी मिळून तीन घरफोडी केल्याची कबुली पंकजने दिली आहे. त्याच्याकडून एक लाख 74 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये कार, मोबाईल, लॅपटॉप, चांदीच्या शिक्क्यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी प्रणव फरार आहे. प्रणवचा शोध पोलीस घेत आहेत. त्याला लवकरच अटक करणार आहोत, असे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी सांगितलं.

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा

प्रणव ठाकरे हा या चोरीचा मास्टरमांईड आहे. त्याच्यावर चोरीचे, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. बेलतरोडीचा गुन्हा दाखल होता. यात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. तिची सुटका केली आहे. या गुन्ह्याचा तपास बेलतरोडी पोलिसांकडे तपासासाठी दिले आहे. प्रणव हा नवीन मुलांना घेऊन चोरी करतो. प्रणवला अटक झाल्यास त्याच्याकडून अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहे. चोरी करणे हे वाईटच. पण, या नादाला लावणेही तेवढेच वाईट. असं काम करणारा आरोपी सध्या निसटला. पोलिसांच्या तावडीत केव्हा ना केव्हा तरी येईलच.

71 हजारांची ऑनलाईन फसवणूक

गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीत ऑनलाईन फसवणुकीची घटना पुढे आली आहे. आरोपीने कॅशबॅक आणि आयफोनचे आमिष देत सोनिया दिवाण यांच्याकडून बँक खात्याची संपूर्ण माहिती मिळवली. त्यानंतर सोनिया दिवाण यांच्या खात्यातून 71 हजार 182 रुपये काढून घेतले. सात जानेवारी रोजी, मध्यरात्रीनंतर दीड वाजताच्या सुमारास गिट्टीखदान हद्दीतील दिनशॉ फॅक्टरीजवळ राहणाऱ्या सोनिया दिवाण यांच्या मोबाईलवर एका अज्ञात आरोपी इसमाने कॉल केला. त्याने फिर्यादी यांनी कॅशबॅक व आयफोन जिंकले असल्याचे सांगितले. ते मिळविण्याकरिता फिर्यादीच्या मोबाईलचा युपीआय कोड मागितला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या खात्यातून 71 हजार 182 रुपये काढले.

Nagpur Medical | अखेर भेट झाली! महिनाभरापासून सुरू होते उपचार; घरच्यांना पाहिल्यावर झाले स्मरण

Tarri Pohe | नागपुरातील तर्री पोह्याची चव हरपली; रूपम साखरे यांचे निधन

Nagpur Corona | लग्नसमारंभात पन्नास जणांनाच परवानगी; पण, लक्षात कोण घेतोय?, नागपूर मनपा प्रशासन उगारतोय बडगा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.