Nagpur Crime | पत्नी सोडून जाईल या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न; नागपुरात नेमकं काय घडलं?

लग्नाचा पुरावा नव्हता. पत्नीच्या पालकांनी तक्रार केली. आता ती आपल्याला सोडून जाईल, या भीतीनेचं युवकानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उमरेडमध्ये घडली.

Nagpur Crime | पत्नी सोडून जाईल या भीतीने आत्महत्येचा प्रयत्न; नागपुरात नेमकं काय घडलं?
उमरेड पोलीस ठाणे
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 12:53 PM

नागपूर : पत्नी सोडून जाईल, या भीतीने पतीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempted suicide) केलाय. नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलीस स्टेशन (Umred Police Station) आवारात ही घटना घडलीय. प्रदीप रघुवीर पटेल असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीचे नाव आहे. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे प्रदीप यांचा जीव वाचला. प्रदीप मूळचा मध्य प्रदेश येथील सागरचा रहिवासी आहे. सध्या तो नागपुरात राहतो. पत्नीच्या घरच्यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी त्यांना लग्नाचा पुरावा (proof of marriage) मागितला. पती-पत्नी उमरेड पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पण पत्नी घरच्यांसोबत जाईल. या भीतीने प्रदीप याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.

दोघेही मूळेच मध्य प्रदेशातील

पती-पत्नी दोघेही मूळचे मध्य प्रदेशातील. पळून आले आणि एकत्र राहू लागले. याची कुणकुण मुलीच्या आईवडिलांना लागली. त्यामुळं ते तक्रार देण्यासाठी पोलिसांत गेले. आता आपली सहचारिणी तिच्या आईवडिलांसोबत निघून जाईल. अशी भीती त्याला वाटली. त्यामुळं त्यानं हे आत्मघाती पाऊल उचललं. ती आपल्यापासून वेगळी झाल्यास आपलं कसं होणार, असा प्रश्न त्याला सतावत होता. त्यातून त्यानं हे पाऊल उचललं असावं, असं पोलिसांना वाटतं. घटनेनंतर पोलिसांनी प्रसंगावधान साधलं. त्यामुळं त्याचा जीव वाचला. योग्य वेळी उपचार मिळाले नसते तर अडचण झाली असती. त्यामुळं बेकायदेशीर काम करताना जरा विचार केला पाहिजे. अन्यथा कोणती वेळ कशी येईल. काही सांगता येत नाही.

दारुच्या वादातून मारहाण

दुसऱ्या एका घटनेत, नागपूरात दारुवरून वाद झाला. उरई (पुणे) येथील राहुल सहानी हा कंत्राटदार आहे. राहुलची कपिलनगर येथे राहणार्‍या प्रल्हाद लांडे (१९) याच्याशी ओळख होती. त्यामुळे राहुल हा प्रल्हादला भेटण्यासाठी कपिलनगरात गेला होता. त्यानंतर रात्रीच्या वेळी राहुल, प्रल्हाद आणि विधी संघर्षग्रस्त मुलगा असे तिघे जरीपटका येथील राजमोहन बार येथे दारू पिण्यासाठी गेले. प्रल्हादने मनसोक्तपणे दारू घेतली. त्यानंतर ते सर्वजण बारबाहेर आले. प्रल्हादला पुन्हा दारू पिण्याची इच्छा झाली. पण, अगोदरच खूप दारू प्यालेल्या प्रल्हादला दारू पिण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात वाद झाला. यात प्रल्हादने लोखंडी रॉडने राहुल यास मारहाण केली.

हिंगणघाटातील अंकिता जळीतकांडाचा निकाल आता नऊ फेब्रुवारीला; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती

स्वयंरोजगारासाठी वित्त पुरवठ्याच्या महत्त्वाच्या योजना; नागपुरात कुठे आणि कसा संपर्क साधता येईल जाणून घ्या…

Nagpur Traffic | नेहरूनगर झोनमधील गडरलाईनचे काम सुरू; दोन मार्चपर्यंत वाहतूक मार्गात काय झालेत बदल?

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...