Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाइंड समीर वानखेडेच, अटक करून चौकशी करा; काँग्रेसची जोरदार मागणी

मुंबईतील क्रुझ पार्टीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपचा हात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय. नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपच्या सत्तेच्या सावटाखाली देशात ड्रग्जचा व्यापार होतोय, असे ते म्हणाले.

ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाइंड समीर वानखेडेच, अटक करून चौकशी करा; काँग्रेसची जोरदार मागणी
atul londhe
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 1:40 PM

नागपूर : मुंबईतील क्रुझ पार्टीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपचा हात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe)यांनी केलाय. नागपुरात(Nagpur ) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपच्या सत्तेच्या सावटाखाली देशात ड्रग्जचा(Drugs) व्यापार होतोय, असे ते म्हणाले.

ड्रग्ज सापडलेली इनोव्हा गाडी एमएच 12- 3000 ही गाडी रवींद्र कदम यांच्या नावावर आढळली. त्यांचा पत्ता कराडचा आहे. याच गाडीत 21 सप्टेंबरला तीन हजार किलोचा ड्रग्ज पकडले गेले. त्यानंतर ते 22 सप्टेंबरला गुजरातमध्ये पोहचतात. ते गुजरातचे मंत्री राणा यांना भेटतात. त्यानंतर दोन ऑक्टोबरला काम हो गया, असा व्हिडिओ व्हायरल होतो. त्यापूर्वीसुद्धा याच गाडीतून ड्रग्ज गेल्याची माहिती आहे. सुनील पाटील हे समीर वानखेडेशी संबंधित आहेत. या सर्वांचा मास्टरमाइंड समीर वानखेडे आहे. त्यामुळं त्यांनाही अटक करण्यात यावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली. गाडीमालक रविंद्र कदम यांना अटक केली, तर वास्तव बाहेर येईल. कराड येथील दिलेल्या पत्त्यावर रवींद्र कदम राहत नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

समीर वानखेडेंना अटक करा

देशात आलेले ड्रग्ज लपवण्यासाठी हिंदू-मुसलमान वादाचा घाट घातला जातोय. गौतम अदानीच्या पोर्टवर ड्रग्जची झालेली कारवाई जगातली सर्वात मोठी कारवाई आहे. पण, यापासून लक्ष भटकावं म्हणून मुंबई ड्रग्ज प्रकरण काढण्यात आल्याचं अतुल लोंढे म्हणाले. मध्यप्रदेशातील नीरज यादव हा भाजपचा कार्यकर्ता आहे. ड्रग्ज प्रकरणाचा मास्टर माइंड एनसीबीचे समीर वानखेडे आहेत. त्यांना अटक करावी. 50 लाखांची देवाणघेवाण झाल्याची चर्चा आहे. नशेचा विळखा घातला जातोय. याची महाराष्ट्र सरकारनं चौकशी करावी. ही देशाच्या लोकशाहीची बाब आहे. युवकांचे भविष्य बिघडविण्याचे काम भाजप करत आहे. गाडीचा मालक रवींद्र कदम, सुनील पाटील, समीर वानखेडे, किरण गोसावी, भानुशाली हे एकदुसऱ्याची संबधित आहेत. त्यांचे फोटोग्राफ समोर आले. देशभक्तीच्या गोष्टी करणारे लोकं या ड्रग्ज रॅकेटमध्ये दिसतातहेत. यांचे फोटो भाजपच्या नेत्यांसोबत आहेत, यामधून भाजपचे संबंध ड्रग्जशी जुळत असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला.

फटाके दिवाळीत फोडतात, दिवाळीनंतर नव्हे

देवेंद्र फडणवीस म्हणतात, दिवाळीनंतर फटाके फोडणार. पण, फटाके दिवाळीतच फोडले जातात, असा टोला अतुल लोंढे यांनी फडणवीस यांना लगावला. ड्रग्सशी संबंधित लोकांचे फोटो हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. अशावेळी महाराष्ट्राचे मंत्री नबाव मलिक यांनी आरोप केला असेल, तर त्याला खोट कस समजायचं, असं लोंढे म्हणाले. नबाव मलिक हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, त्यांनी केलेले अारोप हे विचारपूर्वक केले असतील. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर झालेल्या अारोपांचे खंडण केलेले नाही. उलट, नबाव मलिकांचे अंडरवर्डचे संबंध काढणार, असे फडणवीस म्हणाले, याचा अर्थ फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गुन्हे जगताला पोषक वातावरण करून दिले होते का, असा प्रश्न उपस्थित होतो. ही लढाई देशाच्या भविष्याची आहे. एनआयए हे केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत येते. त्यांच्याकडेच चौकशी कशी जाते, असा सवालही लोंढे यांनी केलाय.

अर्णव गोस्वामींवर कारवाई का नाही

अर्णव गोस्वामींच्या व्हाट्सअप चॅटमध्ये हमने जजको अडजस्ट कर लिया, अशा गोष्टी बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. पण, आर्यन खानला अटक केली. त्यावर काही म्हणण नाही. आर्यनकडे ड्रग्ज सापडले का. त्याची तुम्ही मेडिकल टेस्ट का केली नाही. त्याला ड्रग्जची सवय आहे, असं तुमचं म्हणण आहे तर ते तुम्ही का सिद्ध केलं नाही. 249 किलो ड्रग्ज ज्यांच्याकडे सापडलं त्याला जामीन देता आणि आर्यनला 27 दिवसांची जेल देता, हे सुडाचे राजकारण आहे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला.

इतर बातम्या : 

मलिक यांच्या आरोपानंतर ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत गलका’, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अधिकार काय?; वानखेडेंना न्याय मिळेल?

किरीट सोमय्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल सुरुच; पवार, ठाकरे, देशमुख, राऊतांवर निशाणा

देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याचा उल्लेख नाही, वानखेडेंकडे पंचनामा मागा: नवाब मलिक यांचा पलटवार

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.