“सीमावाद आहे न्यायालयात, तरीही तुम्ही विधानसभेत ठराव घेतलाच कसा”; राष्ट्रवादीच्या नेत्याचा थेट सवाल
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादावर बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवरही वादग्रस्त टीका केली आहे. त्यांनी सीमावादावर बोलताना महाराष्ट्राला एक इंचही जमीन आम्ही देणार नाही असा ठराव विधानसभेत पास करून घेतला.
नागपूरः सीमावादावरून दोन्ही राज्यात घमासान चालू असतानाच महाराष्ट्रात आता त्यावरून टोकाचे राजकारण चालू झाले आहे. दोन्ह राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चर्चा झाली होती. त्यानंतर हे प्रकरण सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानंतरही बसवराज बोम्मई यांनी चिथावणीची भाषा आणि वक्तव्य चालूच ठेवली होती. त्यातच केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करूनही बसवराज बोम्मई यांनी काल कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही असा ठराव पास करण्यात आला.
त्याचवेळी संजय राऊत यांच्यावर त्यांनी जोरदार टीका करत असताना त्यांना त्यांनी देशद्रोही असा उल्लेख करत ते चीनचे एजंट असल्याची टीकाही त्यांनी केली. यावर आमदार रोहित पवार बोलताना म्हणाले की, आधी मी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा जाहीर निषेध करतो म्हणत त्यांनी त्यांच्यावरही जोरदार हल्लाबोल चढविला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सीमावादावर बोलताना कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी सीमावादाचा प्रश्न हा न्यायालयात असतानाही कर्नाटकच्या विधानसभेत हा ठराव पारीत होऊच कसा शकतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे न्यायालयाविरोधात जाऊन हा ठराव पास करणाऱ्या कर्नाटक सरकारचा मी जाहीर निषेध करतो म्हणत त्यांनी जोरदार त्यांच्यावर टीका केली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादावर बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवरही वादग्रस्त टीका केली आहे. त्यांनी सीमावादावर बोलताना महाराष्ट्राला एक इंचही जमीन आम्ही देणार नाही असा ठराव विधानसभेत पास करून घेतला.
त्यावरूनच रोहित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोम्मई यांनी संजय राऊत यांना देशद्रोही असंही म्हटले आहे. संजय राऊत म्हणजे चीनचे एजंट असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
त्यामुळे रोहित पवार यांनी एका महाराष्ट्रातील खासदारवर टीका होऊनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का असा सवाल त्यांनी महाराष्ट्र सरकारला विचारला आहे.
त्यामुळे रोहित पवार यांनी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करून सीमावाद न्यायालयात असताना तुम्ही विधानसभेत ठराव पास करताच कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.