सावधान! आजीबाई लस घेतली का पैसे मिळतात? बँकेत नेले आणि दागिने काढून घेतले

कोरोनाची लस घेतल्यावर पैसे मिळतात, असं कोणी सांगत असेल, तर त्याच्यावर विश्वास ठेऊ नका. कारण, असंच सांगून एका वृद्ध महिलेची नागपुरात फसवणूक करण्यात आली. वृद्ध महिलेला बँकेत नेले आणि तिच्याकडील दागिनेच काढून घेतले.

सावधान! आजीबाई लस घेतली का पैसे मिळतात? बँकेत नेले आणि दागिने काढून घेतले
नागपुरात याच एसबीआय बँकेत नेऊन वृ्द्ध महिलेची फसवणूक करण्यात आली. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 3:45 PM

नागपूर : शांतीनगर पोलीस स्टेशनच्या (Shantinagar Police Station) हद्दीत ही घटना घडली. एका 65 वर्षीय महिलेची (65 year old woman) फसवणूक झाली. ताराबाई हेडाऊ असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे. त्या पाचपावली भागात राहतात. ताराबाई या शांतीनगर परिसरातील बाजारात गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना एक साधारणतः 35 वर्षीय महिला भेटली. तिने ताराबाई याना तुम्ही कोरोनाची लस घेतली (vaccinated against corona) का विचारलं. वृद्ध महिलेने लस घेतली असल्यानं होकार दिला. मग त्या महिलेने लस घेतली तर पैसे मिळतात. तुम्हाला माहीत नाही का, असं विचारलं. यावर या वृद्ध महिलेने विश्वास टाकला. आणि तिथंच फसगत झाली. आजीबाई तुम्ही माझ्यासोबत बँकेत चला. असं म्हणून आरोपी महिलेनं आजीबाईला बँकेकडे घेऊन गेली.

बँकेच्या गेटजवळ बसवले नि दागिने लांबविले

आरोपी महिलेने वृद्ध महिलेला ऑटो रिक्षात बसविले. तुम्हाला कर्ज पाहिजे का, असंही विचारलं. ताराबाई यांनी तिथंही होकारचं दिला. तिच्या कानातील सोन्याचे दागिने दे. मग कर्ज मिळवून देतो, असं म्हणून तिच्या कानातील दागिने काढायला लावले. कानातील दागिने घेऊन तिला बँकच्या बाहेर उभं राहायला सांगितलं. स्वतः बँकेत जात असल्याचं दाखवलं आणि नजर चुकवून दागिने घेऊन ती पसार झाली. ताराबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून फसवणूक करणाऱ्या महिलेचा शोध सुरू केला. अशी माहिती शांतीनगरचे पोलीस निरीक्षक गणेश जामदार यांनी दिली.

अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका

सर्वसाधारण महिलांना लुटण्याचा हा नवीन प्रकार समोर आला. त्यामुळे कोणी काहीही सांगितलं तरी त्यावर विश्वास न ठेवता आधी खात्री करा असा सल्ला पोलीस देत आहेत. कोरोनाची लस घेतली असेल तर पैसे मिळतात. बँकेत चला असं एका 65 वर्षीय महिलेला सांगून तिची फसवणूक करण्यात आली. महिलेने सोन्याचे कानातील दागिने घेऊन पसार झाली. पोलिसांनी गुन्हे दाखल करत त्या फसवणूक करणाऱ्या महिलेचा शोध सुरू केला.

Video – युक्रेनमध्ये अडकलेले विदर्भातील 2 विद्यार्थी नागपुरात परतले, विमानतळावर जल्लोषात स्वागत

नागपूर मनपातील स्टेशनरी घोटाळा, सातव्या आरोपीला अटक, तीन मार्चपर्यंत कोठडी

Video – अमरावतीमध्ये चोरट्यांनी फोडल्या दोन बँका! तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...