Bhandara Tiger | वाघ बचाव मोहिमेवर कोट्यवधी खर्च, तरीही वर्षभरात देशात 59 वाघांची शिकार, कारण काय?

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात जानेवारी 2022 मध्ये दोन वाघांची शिकार करण्यात आली. देशात 2021 पासून 59 वाघांची शिकार झाली आहे. वाघांची बचाव मोहिमेवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार का होते.

Bhandara Tiger | वाघ बचाव मोहिमेवर कोट्यवधी खर्च, तरीही वर्षभरात देशात 59 वाघांची शिकार, कारण काय?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 10:38 AM

तेजस मोहतुरे 

भंडारा : भंडारा जिल्ह्यात एकूण 1347.77 स्क्वेअर किलोमीटर एवढा वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रामध्ये वाघ, बिबट, अस्वल (Tigers, bibs, bears) यासारखे वन्यप्राणी आहेत. या वन्य प्राण्यांची भंडाऱ्यामध्ये शेतीचे पीक वाचविण्यासाठी विजेचा करंट लावला जातो. मागील सात-आठ वर्षामध्ये जवळपास अठरा वाघांची शिकार (Tiger hunting) झाली आहे. यासह इतरही वन्यप्राण्यांची इथे शिकार केली जाते. देशातील मध्यभागी असलेल्या विदर्भाला वाघाचा कॅरिडॉर (The tiger corridor to Vidarbha) समजला जातो. त्यामध्ये पेंच, कोका, नवेगाव-नागझिरा, उमरेड करांडला, ताडोबा, चिखलदरा, तसेच मध्यप्रदेश येथील कान्हा केशरी व बालाघाट हा भाग वनांची आच्छादलेला आहे. वाघ मोठ्या प्रमाणात मायग्रेट होत असतात. मात्र वाघ प्रादेशिक वनात आल्यानंतर त्यासाठी कुठलेही ठोस उपाययोजन वनविभाग करत नाही. त्यामुळे वाघांचे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार चेतन भैरम तसेच संजय मते यांनी व्यक्त केले.

असंरक्षित वनक्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज

मध्यप्रदेशच्या फासेपारधी समाजाचे लोक बहुतांश वाघाची शिकार करतात. यासाठी स्थानिक लोकांचीही मदत घेतात. तर अस्वल, रानडुक्कर, बिबट्या, हरीण सारख्या प्राण्यांची शिकार स्थानिक लोकच करतात. विशेषता संरक्षित वनक्षेत्राच्या व्यतिरीक्त प्रादेशिक वन क्षेत्रामध्ये या शिकारी मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे शासनाने संरक्षित वनक्षेत्राप्रमाणेच असंरक्षित असलेल्या वनक्षेत्र कडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे मत वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केला आहे.

वनविभाग फक्त दिखावा करतो काय

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीव प्राण्यांची हत्या करणारे थांबविणे आता गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने अजून कठोर पावले उचलण्याचे मत वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केले आहे. देशात 2021 मध्ये एकूण 169 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 113 वाघाचा मृत्यू हे नैसर्गिक झाले आहे. तर 59 वाघांची शिकार झाली आहे. 2022 मध्ये या एका महिन्याच्या कालावधीत 13 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यात 10 वाघांचा मृत्यू नैसर्गिक झाला आहे. तीन वाघांची शिकार झाली आहे. या पैकी भंडारा गोंदिया जिल्ह्यात 15 दिवसांत दोन वाघांची शिकार झाली असल्याने वनविभागाच्या टायगर बचाव मोहिमेचा वनविभाग फक्त देखावा करतो काय अशाही प्रश्न मानद वन्यजीव सदस्य नदीम खान यांनी व्यक्त केला आहे.

तब्बल सहा महिन्यांनंतर मिळणार विद्यार्थ्यांना पोषण आहार; नागपूर जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना होणार लाभ?

कुत्रं पाळायचंय! या आणि देशी कुत्र्याचं पिल्लू घेऊन जा; प्राणीमित्र संघटनेचा दत्तक देण्याचा उपक्रम

सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.