AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या औद्योगिक शहराची नगरपरिषद दत्तक, नितीन गडकरींचं स्तुत्य पाऊल

बुटीबोरी नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज जाहीर केला. यापूर्वी नितीन गडकरी यांनी गावं दत्तक घेतली आहेत, पण पहिल्यांदाच त्यांनी नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णय घेतला

महाराष्ट्राच्या औद्योगिक शहराची नगरपरिषद दत्तक, नितीन गडकरींचं स्तुत्य पाऊल
नितीन गडकरी
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 3:35 PM
Share

नागपूर : भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक शहर बुटीबोरीची नगरपरिषद (Butibori Nagar Parishad) दत्तक घेतली. गडकरींना आतापर्यंत गावं दत्तक घेतली आहेत, मात्र नगरपरिषद दत्तक घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. नागपूर शेजारी (Nagpur) असलेल्या बुटीबोरीची औद्योगिक शहर म्हणून ओळख आहे. (BJP Leader Nitin Gadkari adopts Butibori Nagar Parishad near Nagpur)

नागपूर शेजारील औद्योगिक शहर

बुटीबोरी नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज जाहीर केला. बुटीबोरी शहराचा सर्वांगीण विकास आणि हरित शहर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं. नागपूर शेजारी असलेल्या बुटीबोरीची औद्योगिक शहर म्हणून सर्वत्र ख्याती आहे. गडकरींनी बुटीबोरी उड्डाणपुलाचे आजच लोकार्पण केले. या पुलामुळे वर्धा, हैद्राबाद आणि चंद्रपूरकडे जाणारी वाहतूक सुरळीत आणि जलद होणार आहे.

नगराध्यक्षांकडून आभार

यापूर्वी नितीन गडकरी यांनी गावं दत्तक घेतली आहेत, पण पहिल्यांदाच त्यांनी नगरपरिषद दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. ‘बुटीबोरीच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत’ अशी ग्वाही गडकरींनी यावेळी बुटीबोरीवासियांना दिली. बुटीबोरी नगरपरिषद दत्तक घेतल्याबद्दल नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले.

बुटीबोरी उड्डाणपुलाचे गडकरींच्या हस्ते लोकार्पण

लोकसभेत नागपूरचं नेतृत्व

नितीन गडकरी सध्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून धुरा सांभाळत आहेत. संसदेत ते नागपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. बुटीबोरी नगरपरिषद ही त्यांच्या नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येते.

संबंधित बातम्या :

Youtube चॅनलमधून गडकरी महिन्याला किती कमावतात? पहिल्यांदाचा जगजाहीर खुलासा, ऐका त्यांच्याकडूनच!

वेल डन! फडणवीसांचा एक निर्णय, जो प्रत्येक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधीनं कम्पलसरी राबवावा!

(BJP Leader Nitin Gadkari adopts Butibori Nagar Parishad near Nagpur)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.