Nana Patole | राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न, नागपुरात नाना पटोले यांना हल्लाबोल

केंद्रीय तपास यंत्रणेचा कितीही दुरुपयोग केला तरीही हे सरकार पडणार नाही. महाराष्ट्रात भोंगा वाजवायचा प्रयत्न झाला. त्यावरून राज्यात जातीय जंगल घडेल असा कयास बांधलाय. राज्यात जातीय दंगल घडवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा हल्ला नाना पटोले यांनी चढविला.

Nana Patole | राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न, नागपुरात नाना पटोले यांना हल्लाबोल
nana patole-Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 1:06 PM

नागपूर : केंद्राच्या अत्याचारी यंत्रणेची माहिती देण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) पंतप्रधान यांना भेटायला गेले होते, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. केंद्राच्या जुलमी आणि अघोषित आणिबाणीबाबत पंतप्रधान यांना सांगायला शरद पवार गेले होते. केंद्रीय तपास यंत्रणेचा (Central Investigation Agency) कितीही दुरुपयोग केला तरीही हे सरकार पडणार नाही. महाराष्ट्रात भोंगा वाजवायचा प्रयत्न झाला. त्यावरून राज्यात जातीय जंगल घडेल असा कयास बांधलाय. राज्यात जातीय दंगल घडवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा हल्ला नाना पटोले यांनी चढविला. सुडबुद्धीच्या राजकारणाचा परिणाम आज भाजपला कळत नाही. ज्या दिवशी भाजपला कळेल त्या दिवशी भाजपकडे काहीही राहणार नाही. आज महागाई, बेरोजगारी, शेतकरी या प्रश्नावर बदल देण्याचा प्रयत्न आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) हायकमांड निर्णय घेणार आहे, असंही पटोले म्हणाले.

रस्त्यावर उतरण्याची गरज

जे नेते विरोधात बोलतात त्यांच्या मागे ससेमिरा लावला जातो. महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकार फेल झालंय. त्यामुळे केंद्र सरकारच्या अत्याचाराच्या विरोधात विरोधात इंग्रजांच्या काळाप्रमाणे रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. आणि जर संजय राऊत असे करत असतील. आणि त्यासाठी त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत असेल तर त्यात वावगे काय, असंही नाना पटोले म्हणाले.

भाजपचा जातीय दंगल घडविण्याचा प्रयत्न

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. केंद्रातला सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय विरोधात गैरवापर करतोय. हे गाऱ्हाणं सांगायला शरद पवार पंतप्रधानांना भेटले. पंतप्रधान कुठल्या पक्षाचा नसतो असे आम्ही समजतो. पवारांनी पंतप्रधानांकडे संजय राऊत संदर्भातली परिस्थितीही सांगितली आहे. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. आता काही राजकीय पक्ष मशिदीवरील भोंगे काढावे, असा फतवा काढत आहेत. राज्याचे भाजपचे नेते त्याला पाठिंबा देत आहेत. म्हणजेच भाजपचे नेते जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न आहेत. महाराष्ट्राची जनता अशा प्रयत्नांना कधीही पाठिंबा देणार नाही जनता समजूतदार आहे, असंही पटोले यांनी सांगितलं.

Nagpur Crime | नोकरीच्या निमित्ताने शहरात आणले, बलात्कार करून देहव्यापारात ढकलले, चार आरोपी जेरबंद

Video Chandrapur leopard | बिबट्या आला रे आला! चंद्रपुरात रात्री घरात शिरला बिबट्या, पिंजराबंद करण्यात यश

Video Nagpur Fire | नागपुरात आरा मशीनला भीषण आग, आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्या रवाना

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.