AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : भाजपचं मिशन महाराष्ट्र, शिंदे गटासोबत निवडणुका लढवू, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

भाजपचा (BJP) मिशन इंडिया आहे. भाजपचा मिशन महाराष्ट्र (Maharashtra) आहे. बारामती हेसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून बारामती मिशन महाराष्ट्रमध्ये आहे.

Devendra Fadnavis : भाजपचं मिशन महाराष्ट्र, शिंदे गटासोबत निवडणुका लढवू, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
भाजपचं मिशन महाराष्ट्र, शिंदे गटासोबत निवडणुका लढवू, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
| Edited By: | Updated on: Sep 06, 2022 | 5:19 PM
Share

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले. तुमची पतंगबाजी पाहतो. त्यावेळी मलादेखील मजा येते. ज्याला जे मनात येईल तो ते दाखवितो. ज्याला जे मनात येईल, तस आराखडे बांधतो. ते म्हणाले, मी स्पष्टपणे सांगतो की, भाजप आणि शिवसेना ओरिजनल म्हणजेच शिंदे गट आम्ही एकत्रित निवडणूक लढू. आम्ही मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai Municipal Corporation) भगवा फडकवू. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, की भाजपचा (BJP) मिशन इंडिया आहे. भाजपचा मिशन महाराष्ट्र (Maharashtra) आहे. बारामती हेसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून बारामती मिशन महाराष्ट्रमध्ये आहे. असं लास्ट फ्रंटीयर वगैरे काही नसतं. आमच्यासाठी प्रत्येक सीट महत्त्वाची आहे.

फुले दाम्पत्य सर्वांच्याच मनात

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या सगळ्यांच्या मनात आहेत. परंतु, सरकारी कार्यालयं ही नियमानी चालतात. आदेशानी चालतात. त्यामुळं अशाप्रकारचे आदेश बरेचवेळा काढले जातात. यामुळं फुले दाम्पत्याच्या फोटोसाठी निर्णय घेण्यात आला. राज्यातच नव्हे तर देशात फुले दाम्पत्याचा मान मोठा आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

कुठलीही निवडणूक शेवटची समजूनच लढतो

कुठलीही निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे, असं समजून झोकून द्यावं लागतं. त्यावेळी ती निवडणूक आपल्याला जिंकता येते. हे केवळ मुंबई महापालिकेबद्दल नव्हतं. तर एकूणच निवडणुकीच्या धोरणाबद्दल होतं, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबईच नव्हे, तर राज्यात सर्व महापालिका शिंदे गटाला सोबत घेऊन लढण्यात येणार आहेत. भाजप आणि शिंदे गट सक्रिय झाले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुरू आहेत. कार्यकर्ते जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळं येत्या महापालिका निवडणुकांत ही यूती कितपत यशस्वी होते, हे पाहावं लागेल.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.