Nagpur Crime | नोकरीच्या निमित्ताने शहरात आणले, बलात्कार करून देहव्यापारात ढकलले, चार आरोपी जेरबंद

मित्राच्या प्रेयसीला लॉजवर नेऊन दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर तिचा देहव्यापारासाठी सौदा केला. नागपुरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. एक आरोपी पसार झाला.

Nagpur Crime | नोकरीच्या निमित्ताने शहरात आणले, बलात्कार करून देहव्यापारात ढकलले, चार आरोपी जेरबंद
नागपुरात आरोपींना अटक करताना पोलीस. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 12:21 PM

नागपूर : मित्राच्या प्रेयसीला वेगवेगळे आमिष दाखवून लॉजवर नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आलीय. त्यानंतर तिला देहव्यापारात ढकलत तिच्या देहाचाही सौदा केला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या (Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Social Security Department) पाच आरोपींना अटक केलीय. विशाल उर्फ दत्तू दाभणे ऊर्फ खाटीक, सत्यजित ऊर्फ निखिल बांगड, सचिन इंगळे, आकाश ऊर्फ विक्की भोसले अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अमित लोखंडे हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचही आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. त्यांनी दहावीत असलेल्या मुलीला देहव्यवसाय (Prostitution) करून घेण्यासाठी नागपुरात आणल्याचे उघड झाले.

आरोपी विशाल विरोधात 28 गुन्हे

यातील मुख्य आरोपी विशाल कुख्यात आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाच्या 28 गुन्ह्यांची नोंद आहे. सचिनवरही गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे आहेत. विशालचा एक मित्र जवळच्या गावात राहतो. त्याच्या मैत्रिणीची विशालसोबत ओळख झाली. ती खाजगी काम करायची. या माध्यमातून तिची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. विशालने या दोघींनाही नागपुरात नोकरी आणि पैशाचे आमिष दाखविले. आमिषाला बळी पडताच दोघींनाही नागपुरात आल्या. त्यांना काही दिवस विशालने आपल्या घरी ठेवले.

दोघींनाही ढकलले देहव्यापारात

सत्यजित आणि सचिन यांनी मुलींना हुडकेश्वरातील लॉजवर नेऊन दोघांनी एकीवर बलात्कार केला तर दुसरीवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो मित्राच्या प्रेयसीसाठी ग्राहक शोधायला लागला. अशाप्रकारे दोन्ही मुलींना विशालने देहव्यापाराच्या दलदलीत लोटले. आरोपी आकाश आणि अमितने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. त्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली.

Video Bhandara Fire | भंडाऱ्यात चालत्या इलेक्ट्रिक स्कुटीने घेतला पेट, स्कुटी आगीत जळून खाक

Video Nagpur Fire | नागपुरात आरा मशीनला भीषण आग, आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्या रवाना

Nagpur Election | नागपूर मनपाच्या निवडणुका केव्हा होणार? मे, जून की, सहा महिने लांबणार

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.