Video Chandrasekhar Bavankule | पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात रेतीचोरी, राजकीय हस्तक्षेप असल्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

भंडारा, वर्धा रेती चोरी चालू आहे. यात राजकीय हस्तक्षेप आहे. राज्य सरकारचे अलिखित आदेश आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना रेती चोरी करू द्या. मोठ्या प्रमाणावर एनजीपीच्या नियमांचा भंग केला जातो. नदीमध्ये रॉयल्टीविना रेतीचोरी होत आहे. लिलाव करण्यात आला नाही. यात भ्रष्टाचार होत आहे.

Video Chandrasekhar Bavankule | पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात रेतीचोरी, राजकीय हस्तक्षेप असल्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप
पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात रेतीचोरीImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 12:32 PM

नागपूर : नागपूर, भंडारा आणि हिंगणघाट (Nagpur, Bhandara and Hinganghat) वर्ध्यात मोठ्या प्रमाणात रेतीचोरी होत असल्याचे प्रकार पुढं आले आहेत. या रेती चोरीत राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (BJP leader Chandrasekhar Bavankule) यांनी केलाय. लिलाव न होता रेतीचोरी होत असून, रेतीचोरीसाठी राज्य सरकारचे अलिखित आदेश असल्याचाही आरोप त्यांनी केलाय. नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचा (National Green Tribunal) भंग करुन रेती उपसा सुरू आहे. दोन हजार हजार टन रेतीचा सर्रास अवैध उपसा होतोय. नागपूर, भंडारा, हिंगणघाट वर्ध्यातील रेतीचोरीबाबत भाजप एनजीटीकडे तक्रार करणार आहे. राजकीय दबावामुळे तिन्ही जिल्ह्यातील एसपी, कलेक्टर शांत आहेत, असाही आरोप बावनकुळे यांनी केलाय.

काय म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे

राज्य सरकारचे अलिखित आदेश आहेत. त्यानुसार, महाविकास आघाडीच्या नेत्यांना रेतीचोरी करू द्या. त्यामध्ये हस्तक्षेप करू नका, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते म्हणाले, या मध्ये भंडारा, वर्धा रेती चोरी चालू आहे. यात राजकीय हस्तक्षेप आहे. राज्य सरकारचे अलिखित आदेश आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना रेती चोरी करू द्या. मोठ्या प्रमाणावर एनजीपीच्या नियमांचा भंग केला जातो. नदीमध्ये रॉयल्टीविना रेतीचोरी होत आहे. लिलाव करण्यात आला नाही. यात भ्रष्टाचार होत आहे. नागपूर, भंडारा, वर्धा येथील लोकांवर कारवाई केली गेली पाहिजे. दोन हजार टन रेती चोरी केली जाते. तक्रार केली आहे. या संपूर्ण दोषींवर कारवाई केली गेली पाहिजे. जिल्हाधिकारी शांत बसले आहेत, असा आरोपही बावनकुळे यांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक

भंडारा येथे रेतीचोरी होत असल्याचे आधी डॉ.परिणय फुके यांनी सांगितलं होतं. त्यासाठी त्यांनी वरिष्ठांकडं तक्रारी केल्या होत्या. पण, काही कारवाई झालेली दिसत नाही. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलकडं तक्रार केली आहे. त्यामुळं या रेतीचोरांवर काय कारवाई होते, ते पाहावं लागेल. विशेष म्हणजे या रेतीचोरीत साऱ्याच पक्षांचे काही ना काहीतरी नेते सहभागी असतात, अशी माहिती आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.