Nagpur Police | चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात; नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल व्हावा, यासाठी करत होते आंदोलन

चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकत्यांनाही पोलिसांनी अटक केली. महिला कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करून घेतली.

Nagpur Police | चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात; नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल व्हावा, यासाठी करत होते आंदोलन
चंद्रशेखर बावनकुळे यांना ताब्यात घेताना पोलीस.
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 2:55 PM

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध जे आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून आंदोलनाला बसले होते. जोपर्यंत FIR होत नाही तोपर्यंत इथेच बसण्याचा त्यांनी इशारा दिला होता. त्यामुळं आता पोलिसांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकत्यांनाही पोलिसांनी अटक केली. महिला कार्यकर्त्यांनी स्वतःला अटक करून घेतली.

न्यायालयात जाण्याचा बावनकुळे यांचा इशारा

कोरोना पोलीस ठाण्यासमोर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन केले. नाना पटोले यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. कार्यकर्ते काही हटायला तयार नव्हते. त्यामुळं त्यामुळं पोलिसांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना ताब्यात घेतले. बावनकुळे बसले असताना त्यांना उठविण्यात आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, नाना पटोलेंच्या अटकेच्या मागणीवर पोलीस कारवाई करत नाहीत. त्यामुळं आता आम्हा न्यायालयात जाणार. पोलीस राज्य सरकारच्या दबावात आहेत. त्यामुळं गुन्हा दाखल करत नाहीत. राज्य सरकार लोकशाहीचा खून करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

विमानतळावर तसेच नानांच्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपूर निवासस्थानी सुरक्षाव्यवस्था वाढवली. नाना पटोलेंच्या नागपूरच्या रहाटे कॉलनी घराबाहेर राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस आणि स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले. नाना पटोले मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर दाखल झाले. त्यावेळीही नानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. विमानतळावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. नाना पटोले यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त विधानानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झालं आहे.

Fact Check: मोदी नावाचा गावगुंड खरंच आहे का?, नाना पटोलेंच्या गावात ‘टीव्ही9’ची शोध मोहीम; काय आहे सत्य?

Video : अमरावतीहून पोरं निघालेत, शाहिस्तेखानाची फक्त बोटं छाटलेली; नाना पटोलेंनी आपला पंजा सांभाळावा, अनिल बोंडेंचा इशारा

राजीनामा द्या अन् येरवड्यात दाखल व्हा; पुण्याच्या महापौरांची नाना पटोलेंवर खोचक टीका

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.