Chief Justice : नागपुरात सरन्यायाधीश लळीत झाले भावूक, छोट्या कार्यकाळासाठी दिला मोठा संदेश

रुदयार्ड किपलिंग यांची कविता सांगताना सरन्यायाधीश भावनिक झाले. त्यांचे कंठ दाटून आले. I will do everything to the best of my ebility, knowledge and belief...

Chief Justice : नागपुरात सरन्यायाधीश लळीत झाले भावूक, छोट्या कार्यकाळासाठी दिला मोठा संदेश
नागपुरात सरन्यायाधीश लळीत झाले भावूक
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 10:40 PM

नागपूर : सरन्यायाधीश उदय लळीत यांचा आज नागपुरात सत्कार (Satkar) करण्यात आलाय. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीनं सरन्यायाधीश उदय लळीत यांचा सत्कार करण्यात आलाय. यावेळी सरन्यायाधीशांनी नागपुरातील आठवणींना उजाळा दिला. सरन्यायाधीश म्हणाले, नागपूर आणि नागपुरातील लोकांबाबत अनेक आठवणी आहेत. माझ्या वडिलांनी जज असताना कागदावर हाताने बेलबाबत लिहीलं. पण मला असे जज का भेटले नाही, असं म्हणताच कार्यक्रमात हास्य निर्माण झालं. माझं करिअर या नागपूर शहरातून सुरु झालं. माझे वडील जज म्हणून सुनावणी करताना मी त्यांना कधी बघीतलं नाही. पण, नागपुरात पहिल्यांदा मी माझे वडील जज सुनावणी करत असल्याचं मी बघीतलं. महाधिवक्ता ( Advocate General) कुंभकोणी आणि मी सोलापूरला (Solapur) एकाच शाळेत शिकलो. आमची चौथी पिढी वकिली पेशात आहे. सरन्यायाधीश आपले अनुभव सांगताना भावनिक झाले होते. डोळ्यात अश्रू आले. त्यामुळे काही काळ थांबले.

सरन्यायाधीशांच्या चार पिढ्या वकिली व्यवसायात

सरन्यायाधीश लळीत म्हणाले, आमची चौथी पिढी वकिली पेशात आहे. मला आनंद आहे की मी वकिलांच्या कुटुंबातून आहे. माझ्या आजोबांनी 1920 मध्ये सोलापूरला वकिली सुरू केली. आज 102 वर्ष झाले ही मालिका अखंडपणे सुरू आहे. रुदयार्ड किपलिंग यांची कविता सांगताना सरन्यायाधीश भावनिक झाले. त्यांचे कंठ दाटून आले. I will do everything to the best of my ebility, knowledge and belief… सरन्यायाधीश लळीत यांनी ते त्यांच्या तीन महिन्यांच्या कार्यकाळात कसे काम करणार याबद्दल वरील वाक्य बोलून छोटेखानी भाषण संपविले.

पहिल्याच आठवड्यात प्रलंबित प्रकरण निकाली

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई म्हणाले, सरन्यायाधीश लळीत फक्त सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख नाही. तर ते संपूर्ण देशाच्या न्यायव्यवस्थेचे कौटुंबिक प्रमुख आहेत. ते न्यायव्यवस्थेचे प्रमुख म्हणून पूर्णपणे लोकशाहीत विश्वास ठेवणारे आहेत. सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी लगेच सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची बैठक घेतली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना लवकर निकाली काढण्याच्या सूचना देत सर्वोच्च न्यायालयाचे सकाळचे सत्र प्राधान्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांसाठी ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात 10 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित असलेले 106 प्रकरण निकाली निघाले, असंही गवई यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.