VIDEO : ‘दारू विकाल तर घरात घुसून मारू’, चंद्रपुरात नागरिकांचा संयमाचा बांध फुटला, अवैध दारूविक्रेत्याच्या घरावर हल्लाबोल

चंद्रपुरात अवैध दारूविक्रेत्यांची दादागिरी आता वाढली आहे. ते नागरिकांना आता जीवे मारण्याची धमकी देखीत देऊ लागले आहेत (Citizens aggressive against illegal liquor sale in Chandrapur).

VIDEO : 'दारू विकाल तर घरात घुसून मारू', चंद्रपुरात नागरिकांचा संयमाचा बांध फुटला, अवैध दारूविक्रेत्याच्या घरावर हल्लाबोल
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 4:54 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांपासून म्हणजेच 2015 पासून दारूविक्रीस बंदी आहे. मात्र, तरीही चंद्रपूर शहरात अवैध दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट बघायला मिळतोय. विशेष म्हणजे अवैध दारूविक्रेत्यांची दादागिरी आता वाढली आहे. ते नागरिकांना आता जीवे मारण्याची धमकी देखीत देऊ लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, शहराती इंदिरानगरच्या नागरिकांचा संयम आज सुटला. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन दारु विक्रेत्याच्या घरात घुसून हल्लाबोल केला. तसेच दारू विकाल तर घरात घुसून मारु, अशी ताकीदही नागरिकांनी दिली (Citizens aggressive against illegal liquor sale in Chandrapur).

चंद्रपुरात अवैध दारुविक्रीचा नागरिकांना त्रास

चंद्रपूर जिल्ह्यात या ना त्या मार्गाने दारू तस्करी केली जाते. आरोपी पकडले जातात. कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त होतो . तरीही दारूविक्रीचे प्रमाण वाढतच जाते. आता चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागात विकली जाणारी अवैध दारू परिसरातील नागरिकांची डोकेदुखी ठरू लागली आहे. शहरातील इंदिरानगर भागातील नागरिकाचा संयमाचा बांध असाच फुटला (Citizens aggressive against illegal liquor sale in Chandrapur).

नागरिकांची पोलिसातही तक्रार

इंदिरानगर भागात प्रचंड दारू विकली जाते, असा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार देखील केली आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. पण दारूविक्रेते शिरजोर झाले आहेत. नागरिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा देतात. दारू विकणारे आणि पिणारे आमच्या घराच्या परिसरात गोंधळ घालत असून जीवे मारण्याची धमकी देतात, असेही आरोप येथील रहिवाशांनी केले आहेत.

पोलिसात तक्रार दिल्यानंतर नागरिक आक्रमक

इंदिरानगरच्या नागरिकांनी तक्रार केल्यानंतरही योग्य कारवाई न करण्यात आल्यामुळे त्यांचा संयमाचा बांध फुटला. त्यांनी थेट परिसरातील दारू विक्रेत्याच्या घरावर हल्लाबोल केला. यापुढे जर दारू विकाल तर आम्ही घरात घुसून मारू, अशी ताकीद परिसरातील नागरिकांनी दिली. पोलिसांनी मात्र नियमानुसार कारवाई करू, असे छापील उत्तर दिले.

नागरिकांच्या हल्लाबोलचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : दारुच्या नशेत भल्या पहाटे नंगानाच, पत्नीला मारहाण, पोटच्या मुलाचं डोकं भींतीवर आपटलं, कुटुंबाचा दोष नेमका काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.