Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Srinivas Ramanujan | नागपुरात सामूहिक पाढे वाचन! गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना अनोखी श्रद्धांजली

या उपक्रमामध्ये नागपूर शहरातील 75 शाळांचे पाच हजार विद्यार्थ्यांनी एकस्वरात बे एके बेचे 2 ते 10 पर्यंतच्या पाढ्यांचे सामूहिक वाचन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाढे वाचन करीत विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत केला. चिटणीस पार्कच्या मोठ्या मैदानात स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्ती निमित्ताने विद्यार्थी 75 च्या आकारात बसले होते.

Srinivas Ramanujan | नागपुरात सामूहिक पाढे वाचन! गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना अनोखी श्रद्धांजली
नागपूर येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेते बक्षिसांसह.
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 8:14 PM

नागपूर : थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना नागपुरातील विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली अर्पण केली. नागपूर शहरातील चिटणीस पार्क येथे एकाचवेळी सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी बे एके बेचे सामूहिक पाढे वाचन करीत देशभक्तीच्या संदेशासह गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना वंदन केले. विशेष म्हणजे, नागपूर शहरात आयोजित हा अनोखा उपक्रम चर्चेचा विषय ठरलेला आहे. देशात पहिल्यांदाच एवढ्या व्यापक प्रमाणात सामूहिक पाढे वाचन करण्यात आले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महान गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या अनुषंगाने राष्ट्रीय गणित दिनानिमित्त सामूहिक पाढे वाचन करण्यात आले. नागपूर महापालिका, अग्रेसर फाउंडेशन, मनी बी इन्स्टिट्यूट व दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. 22) हा उपक्रम राबविण्यात आला. महालमधील चिटणीस पार्क येथे बे एके बे सामूहिक पाढे वाचन कार्यक्रम पार पडला. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर व मिलिंद भाकरे उपस्थित होते.

पाठांतर करणे आवश्यक – महापौर

महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागपूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञानाची गोडी लागावी, त्यांची रुची वाढावी यासाठी अग्रेसर फाउंडेशन कार्य करीत आहे. गणिताच्या रुचीसह विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व कळावे, या मागील उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. पूर्वी शाळांमध्ये दररोज पाढे पाठ करण्याची पद्धत होती. मात्र ती पद्धत बंद झाली. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने पाढे पाठांतर आवश्यक आहे. त्यामुळे शाळांमध्ये पुन्हा पाढे पाठांतराची पद्धत सुरू करण्याची गरज आहे. यासाठी मनपाच्या शाळांनी पुढाकार घेऊन ही पद्धत सुरू करावी, अशी सूचनाही यावेळी महापौर तिवारी यांनी केली.

75 शाळांमध्ये सामूहिक पाढे वाचन

अग्रेसरच्या प्रमुख शिवाणी दाणी वखरे यांनी सांगितले की, संपूर्ण शहरात 75 शाळांमध्ये सामूहिक पाढे वाचन झाले आहेत. शहरात केशव नगर येथे भिंत रंगवण्यात आली आहे. तसेच व्हीएनआयटीसमोर व पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासमोरील भिंतसुद्धा रंगविण्यात येणार आहेत. रंगविलेल्या भिंतीद्वारे प्रत्येक बालमनाला गणिताच्या जगाशी जोडण्याचा या उपक्रमाचा मानस आहे.

देवांश सेलोकर मास्टर ऑफ नागपूर

75 शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटामध्ये स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या पहिल्या इयत्ता पाचवी ते सातवी या गटात केंद्रीय विद्यालय अजनी येथील इयत्ता सातवीचा विद्यार्थी देवांश सेलोकर याला मास्टर ऑफ नागपूर पुरस्कार देण्यात आला. द्वितीय क्रमांक गायत्री कॉन्व्हेंटचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी भावेश आष्टणकर तर तिसरा क्रमांक श्री कॉन्व्हेंटमधील इयत्ता सातवीचा विद्यार्थी अथर्व काळे यांनी पटकाविले. इयत्ता आठवी ते दहावी या गटातून टिळक विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी सुजल घोघरे मास्टर ऑफ नागपूर ठरला. विशेष म्हणजे सुजल मुळचा गडचिरोलीचा असून तो मैत्री परिवाराच्या वसतिगृहामध्ये राहतो. या गटातून इस्टर्न कॉन्व्हेंट येथील दहावीचा विद्यार्थी ओम चौधरीने दुसरा व दयानंद विद्यालयाची इयत्ता नववीची विद्यार्थिनी साक्षी पंजाबीने तिसरा क्रमांक पटकाविला.

Nagpur | कर्ज फेडण्यासाठी बनला चोर, वाहनचालकाने केली गाड्यांची चोरी; विक्रीच्या बेतात असताना अडकला

Nagpur | महिन्याभरापासून चर्चा मगरीची! वन विभागाचं मिशन मगर; नाग नदीत लावले पिंजरे, ट्रॅप कॅमेरे

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.