सोमय्यांनी खोटे आरोप करणे बंद करावे, माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार : अतुल लोंढे
भाजपचे किरीट सोमय्या हे खोटं बोलतात, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय. नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. किरीट सोमय्या यांनी एका राष्ट्रीय चॅनलवर काल डिबेटमध्ये राज्य सरकारवर निराधार आरोप केले होते.
नागपूर : भाजपचे किरीट सोमय्या हे खोटं बोलतात, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय. नागपुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. किरीट सोमय्या यांनी एका राष्ट्रीय चॅनलवर काल डिबेटमध्ये राज्य सरकारवर आरोप केले होते.
कोणत्याही पुराव्यांअभावी केले आरोप
राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेची टक्केवारी सोमय्या यांनी डिबेटमध्ये जाहीर केली. राज्य सरकारला मिळणाऱ्या वसुलीच्या रकमेपैकी 40 टक्के रक्कम शिवसेनेला मिळते. 40 टक्के रक्कम राष्ट्रवादीला मिळते, तर 20 टक्के रक्कम काँग्रेसला मिळते, असा आरोप सोमय्या यांनी डिबेटमध्ये केल्याचं लोंढे यांनी सांगितलं. सदर आरोप करत असताना त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नव्हते. सार्वजनिकरित्या असे खोटे आरोप करणं काँग्रेस खपवून घेणार नाही, अशी तंबी त्यांनी दिली. सोमय्या नेहमीच खोटे आरोप करत असतात. त्यांनी केलेले खोटे आरोप रेक्रार्ड केले असून, याची तक्रार नागपूर पोलीस आयुक्तांक डे केली असल्याचं अतुल लोंढे म्हणालेत.
माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा
किरीट सोमय्या यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी बदनामे करणारे गुन्हे दाखल करण्याची मागणी लोंढे हे न्यायालयात करणार आहेत. काल टीव्ही डिबेटमध्ये किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर सुलीचा आरोप केला होता. केलेल्या आरोपाचे किरीट सोमय्या यांनी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी असेही लोंढे म्हणाले. या संदर्भातील पुरावा व्हीडिओ पुरावा पोलीस आयुक्तांना दिल्याचं त्यांनी सांगितले. काँग्नेसनं ॲड. सतीश उके यांची वकील म्हणून नेमणूक केली आहे. सोमय्यांविरोधात न्यायालयात जाणार असून मानहानीचा दावा करणार करणार असल्याचं ते म्हणाले.
भाजपचा खोटेपणा लोकांसमोर आणायचाय
किरीट सोमय्या हे खोटे बोलतात, हे आम्हाला जनतेसमोर आणायचे आहे. भाजपचा खोटेपणा लोकांसमोर आणायचा आहे, असा दावा अतुल लोंढे यांनी केला. सोमय्यांविरोधात एक रुपयाचा मानहानीचा दावा नागपूरच्या न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेची सोमय्या यांना माफी मागावी लागणार असल्याचंही लोंढे यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या