नागपूर झेडपीवर काँग्रेसचा झेंडा, अध्यक्षपदी मुक्ता कोक्कडे, तर उपाध्यक्षपदी…

सदस्य फुटू नये म्हणून काँग्रेसचे 33 पैकी 29 सदस्य सहलीला गेले होते.

नागपूर झेडपीवर काँग्रेसचा झेंडा, अध्यक्षपदी मुक्ता कोक्कडे, तर उपाध्यक्षपदी...
नागपूर झेडपीवर काँग्रेसचा झेंडाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 6:18 PM

सुनील ढगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेवर पुन्हा काँग्रेसचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आलेत. काँग्रेसमध्ये मोठा उत्साह संचारला. कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या बाहेर येत ढोल ताशे वाजवले. फटाके उडवत जल्लोष केला. काँग्रेसच्या मुक्ता कोक्कडे (Mukta Kokkade) यांची अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्ष पदासाठी कुंदा राऊत (Kunda Raut) यांची झाली निवड झाली. भाजपने अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेत काँग्रेस बंडखोर यांना समर्थन दिलं होतं. मात्र तरीही काँग्रेसनं बाजी मारली.

अध्यक्ष पदासाठी मतदान झालं. 39 मत काँग्रेस आघाडीला मिळाली. 18 मत भाजप समर्थित उमेदवाराला मिळाली. 1 सदस्य अनुपस्थित होता.

उपाध्यक्ष पदासाठी 38 मत काँग्रेस आघाडीला मिळाली. 19 मतं भाजप समर्थित उमेदवाराला मिळालीत. तर, 1 सदस्य अनुपस्थित होता. नागपूर जिल्हा परिषद सदस्य संख्या 58 आहे.

भाजपनं जिल्हा परिषदेमध्ये फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आम्ही हाणून पाडला असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली. भाजपनं जिल्हा परिषद हातात घेण्याचा प्रयत्न बंडखोरांच्या मार्फत केला खरा. पण त्यात त्यांना यश आलं नाही.

नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणुकीत काँग्रेसनं खबरदारी घेतली होती. सदस्य फुटू नये म्हणून काँग्रेसचे 33 पैकी 29 सदस्य सहलीला गेले होते.

नाराज असलेले नाना कंभाले, मेधा मानकर, प्रीतम कवरे हे सदस्य काँग्रेसच्या तंबूत नव्हते. काँग्रेसचे काही सदस्य नाराज असल्याने फुटाफुटीच्या चर्चेला उधाण आलं होतं. कळमेश्वरजवळील अंबिका फार्मवर काँग्रेस सदस्यांचा मुक्काम होता.

असे आहे नागपूर झेडपीतील बलाबल

काँग्रेस सदस्य – 31 भाजप सदस्य -14 राष्ट्रवादी सदस्य -9 शिवसेना सदस्य -01 शेकाप सदस्य -01 गोगपा सदस्य -01 अपक्ष – सदस्य 01

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.