…म्हणजे वज्रमुठ सभेत खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न; आशिष देशमुख यांचा नेमका आरोप काय?

काँग्रेस महाविकास आघाडीपासून वेगळी चूल मांडण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा घेत आहेत, असंही देशमुख म्हणाले. यासाठी खोके जबाबदार असल्याचा आशिष देशमुख यांचा आरोप आहे.

...म्हणजे वज्रमुठ सभेत खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न; आशिष देशमुख यांचा नेमका आरोप काय?
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 12:28 PM

नागपूर : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका केली. १६ तारखेला महाविकास आघाडीची सभा आहे. मग लगेच २० ते २५ तारखेला राहुल गांधी यांची सभा घेण्याचे कारण काय, असा सवाल आशिष देशमुख यांनी उपस्थित केला. यामुळे आशिष देशमुख पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. १६ तारखेला नागपुरात वज्रमुठ सभा आहे. असे असताना २० ते २५ तारखेला राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा म्हणजे वज्रमुठ सभेत खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी लावला आहे. काँग्रेस महाविकास आघाडीपासून वेगळी चूल मांडण्यासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची सभा घेत आहेत, असंही देशमुख म्हणाले. यासाठी खोके जबाबदार असल्याचा आशिष देशमुख यांचा आरोप आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पुन्हा टीका केली.

माझ्या विरोधात एकही कारण मिळाले नाही

मी काँग्रेस पक्षाचं हित व्हावं असंच वक्तव्य केलंय. त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्याचं काही कारण नाही. आमदारकीला एक वर्ष बाकी असताना मी काँग्रेसमध्ये आलो. मला कारवाईची नोटीस मिळाली नाही. शिस्तपालन समितीने तीन तास बैठक घेतली. तरीही त्यांना माझ्या विरोधात एक कारण मिळालं नाही, असंही आशिष देशमुख म्हणाले.

हे सुद्धा वाचा

देशमुख आता हिंगण्यातून लढणार?

आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची सुत्रांची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघात निवडणूक लढण्यास आशिष देशमुख इच्छूक असल्याचं कळते. आशिष देशमुख यांच्या आपल्याच पक्षातील नेत्यांवर टीका करण्याच्या स्वभावामुळे राष्ट्रवादीकडून नेट ॲंड वॅाचची भूमिका ठेवावी लागणार आहे. आशिष देशमुख यांचे काका आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचाही विरोध असल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस संधी देणार का?

काँग्रेस कारवाई करणार असल्याने आशिष देशमुख यांच्यासमोर राष्ट्रवादीचा पर्याय राहू शकतो. काँग्रेस नेत्यांवर टीका करणाऱ्या आशिष देशमुख यांना राष्ट्रवादी संधी देणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. आशिष देशमुख म्हणाले, शरद पवार आणि अजित दादा माझ्या शेतावर येऊन गेलेत. हिंगणा मतदारसंघात माझं शेत आहे. याच शेतावर शरद पवार आणि अजित दादा येऊन गेलेत. परंतु, राष्ट्रवादीत जाण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले नाही.

नाना पटोले म्हणतात,…

खोके मिळाल्याने राहुल गांधी यांची सभा आयोजित केल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, नाना पटोलेला विकत घेणारा जन्माला आलेला नाही. माझे मेडिकल कॉलेज नाही. ज्यांना डोनेशन पद्धत माहीत आहे, त्यांना तसे वाक्य सुचतात. पक्ष म्हणून त्यांच्यावर कारवाई होईल, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.