सर्वात मोठी जबाबदारी कोणती; काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं; म्हणाले,…
महाविकास आघाडीची सभा होणार आहे. त्यात आम्ही द्वेषाचे कुठले विचार मांडणार नाही. आम्ही वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार आहोत.
नागपूर : भाजपचा या निमित्ताने खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. सत्तेत आल्यानंतर धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. ही व्यवस्था आमच्या संविधानात नाही. आमचा धर्म सांगतो की, कोणाचाही द्वेष करू नका. पण या ठिकाणी हिंदू धर्माचं नाव घ्यायचं आणि त्याला बदनाम करायचं. हे भाजपचं कटकारस्थान चाललं आहे. जनतेच्या हे लक्षात येत आहे. देशात द्वेषाच राजकारण करू नये. यामुळे मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे आणि हे भाजप करत आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.
ते भाजपने पेरलेले विष
संभाजीनगरमध्ये जे होत आहे ते भाजपने पेरलेलं विष आहे. मी तिथल्या जनतेला आवाहन करेल. धर्माधर्मामध्ये भांडणं करून तेढ निर्माण करतात. त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आपण संविधानाच्या विचाराने गुण्यागोविंदाने नांदलं पाहिजे. महाविकास आघाडीची सभा होणार आहे. त्यात आम्ही द्वेषाचे कुठले विचार मांडणार नाही. आम्ही वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणार आहोत. धर्माधर्मात भांडण लावायला आम्ही चाललो नाही, असंही नाना पटोले म्हणाले.
देशाची प्रतिमा मलिन करण्याचे काम
कर्नाटकमध्ये जे ओपिनियन पोल येत आहे ते आमच्या बाजूने आहे. तो देशभरात आपल्याला पाहायला मिळतो. भाजप इंग्रजांसारखं सत्ता चालवत आहे. हे आता जनतेच्या लक्षात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे दिव्य स्वप्न दाखवले, ते पूर्ण होऊ शकले नाही. देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारने केलं आहे.
हे भगोडे आहेत
देशाच्या जनतेला लुटणारा विदेशात काय ललित मोदी इमानदार असेल तर त्याने देशात यावं. गांधीजींच्या वाटेला गेलं की मग लोक बरबाद होतात, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. निरव मोदी असो की ललित मोदी असो हे भगोडे आहेत त्यांची हिंमत देशात येण्याची नाही, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
विरोधी पक्ष म्हणून खरी जबाबदारी असते ती सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर मांडणं. ते काम आम्ही छत्रपती छत्रपती संभाजीनगरमध्ये करू, असं काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. कर्नाटकातला ओपिनिय पोल देशभरात पाहायला मिळणार आहे. गरीब, शेतकऱ्यांचा उद्धार होऊ शकला नाही. तरुणांचं आयुष्य बरबाद होत आहे, असंही ते म्हणाले.