उपमहापौरपद मिळताच काँग्रेसमध्ये परतणार नाही म्हणणारे नगरसेवक सतीश होले यांची घरवापसी! नागपुरात नाना पटोलेंच्या उपस्थितीत प्रवेश

नगरसेवक सतीश होले (Corporator Satish Hole) हे मूळचे काँग्रेसचे. भाजपने उपमहापौरपद दिले तेव्हा मी काँग्रेसमध्ये कधीच परतणार नाही, असं ते म्हणाले होते. अपक्ष नगरसेवक म्हणून निवडूण आले. भाजपला समर्थन दिले होते. ते आता नाना पटोले यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसवासी झालेत.

उपमहापौरपद मिळताच काँग्रेसमध्ये परतणार नाही म्हणणारे नगरसेवक सतीश होले यांची घरवापसी! नागपुरात नाना पटोलेंच्या उपस्थितीत प्रवेश
नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करताना सतीश होले.
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 5:08 PM

नागपूर : सतीश होले हे दक्षिण नागपूरमधील रघुजीनगर परिसरातील नगरसेवक (Corporator Satish Hole) होते. होले हे महापालिकेत उपमहापौरसुद्धा राहिले आहेत. मात्र त्यांनी आज पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपला धक्का दिला. नागपुरात कॉंग्रेसने महापालिकेसाठी ( Nagpur Municipal Corporation) जोरदार कंबर कसली आहे. त्याची तयारी सुरू केली आहे. आता तर काँग्रेसमध्ये इतर पक्षातील प्रवेश सुरू झालेत. नागपूरमध्ये विकास झाला असं भाजप सांगते. मात्र सगळा विकास कर्ज काढून झाला आहे. त्यामुळे महापालिकेत आमची सत्ता आल्यास अनेक भ्रष्टाचार बाहेर येतील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) म्हणाले.

सतीश होले झाले होते उपमहापौर

भाजपने सहा वर्षांपूर्वी सतीश होले यांना उपमहापौर केले होते. त्यावेळी त्यांनी बसपाच्या उमेदवाराला हरविले होते. त्यावेळी होले म्हणाले होते, काँग्रेसमध्ये कधीही परत येणार नाही. भाजप माझी आहे आणि मी भाजपचा आहे. भविष्यात कधीही काँग्रेसमध्ये परतणार नाही. भाजपमध्ये मी नाराज नाही. या चर्चा वायफळ अशाच आहेत. पण, पद मिळाल्यानं त्यांनी असं म्हटलं होतं. आता मात्र, ते परत काँग्रेसमध्येच आलेत. त्यामुळं पद मिळालं की, तोच पक्ष चांगला. पद गेलं की, दुसऱ्या पक्षाचा मार्ग मोकळा, असंच काहीस गणित काही राजकीय नेत्यांचं असंत. त्याला सतीश होले हे अपवाद ठरलेले नाहीत.

चौकशीसाठी केले होते उपोषण

मध्यंतरी सतीश होले यांनी बाजार विभागावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. मनपाच्या महसुलाचा मोठा हिस्सा बाजारातून मिळत असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सतीश होले यांनी केला होता. त्यासाठी ते उपोषणावरही बसले होते. महापालिका जर एका दुकानाची चौकशी करू शकत नाहीत तर सर्व दुकांनांची चौकशी कशी करतील, असा आरोप त्यांनी लगावला होता. संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची त्यांची मागणी होती. तेव्हापासून ते नाराज असल्याचे समजते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी, विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख

नागपूर मनपा निवडणुकीची धूळवड, काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी फोडला बाँब, भाजपची सत्ता उलथविण्याचा प्लान सांगितला

VIDEO | नागपूर – मुंबई समृद्धी महामार्ग वर्षभरात होणार सुरू; शेतकऱ्यांच्या घरी कशी आली समृद्धी, कसा आहे प्रकल्प?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.